Top News

राष्ट्रवादीला आतापर्यंतचा सर्वात मोठा धक्का, चित्रा वाघ यांचा राजीनामा!

मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसला गेल्या काही दिवसांपासून मोठमोठे धक्के बसत आहेत. आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी मोठं पाऊल उचललं आहे.

चित्रा वाघ यांनी आपल्या पदाचा आणि पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. आपल्याला काम करण्याची संधी दिल्याबद्दल त्यांनी पक्षाध्यक्ष शरद पवार यांचे आभार मानले आहेत.

राष्ट्रवादीचे मोठमोठे नेते पक्षाला रामराम ठोकून शिवसेना आणि भाजपमध्ये प्रवेश करत आहेत. त्यात आता चित्रा वाघ यांची भर पडणार असून त्या भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचं कळतंय.

नुकताच मुंबई राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष सचिन अहिर यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यानंतर आता चित्रा वाघ यांनी राजीनामा दिल्याने राष्ट्रवादीसाठी हा मोठा धक्का आहे.

 

महत्वाच्या बातम्या-

-भाजप पक्ष नाही तर बकासूर आहे; बाळासाहेब थोरातांची जहरी टीका

-माझा 30 वर्षांचा अनुभव मी पणाला लावणार पण…- अजित पवार

-कर्नाटकात अखेर कमळ फुललं! येडीयुरप्पांनी घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ

-…म्हणून श्रीरंग बारणे यांचं पंतप्रधान मोदींनी केलं तोंडभरून कौतुक

-शरद पवार की बाळासाहेब… राजकारणातील आदर्श कोण?; सचिन अहिर म्हणतात…

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या