Top News धुळे महाराष्ट्र

कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष पवार कधी कुस्ती खेळलेत का?; सदाभाऊ खोतांना राष्ट्रवादीचं प्रत्युत्तर

धुळे | भारतरत्न सचिन तेंडुलकरने शेतकरी आंदोलनावर केलेल्या वक्तव्यावरून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सचिनचे कान टोचले होते. यावर रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी पवारांवर टीका केली होती. यी टीकेला राष्ट्रवादीने प्रत्युत्तर दिलं आहे.

पवार कधी क्रिकेट खेळले होते का?, सध्या ते कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष आहेत त्यांनी कधी कुस्ती खेळली होती?, असा सवाल करत खोत यांनी पवारांवर निशाणा साधला होता. याला राष्ट्रवादीचे युवक प्रदेश अध्यक्ष मेहबूब शेख यांनी उत्तर दिलं आहे.

पवार साहेबांनी या वयात कुस्ती खेळणं यांना अपेक्षित आहे का?, आणि या निवडणुकीत पवार साहेबांनी कुस्ती काय असते हे दाखवून दिलं आहे. आपण ज्या नर्सरीत शिकता शरद पवार हे त्या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आहेत हे त्यांनी सिद्ध करुन दाखवलं असल्याचं मेहबूब शेख यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, खोत यांचा मुलगा जिल्हा परिषदेमध्ये पडला आहे. कोणाच्या बाबतीत बोलावं हे त्यांना समजत नाही. सदाभाऊ खोत हे कडकनाथ कोंबडीवाले आहेत ते काहीही बोलू शकतात, असा टोलाही शेख यांनी लगावला.

थोडक्यात बातम्या-

मोहम्मद सिराजने धरला कुलदीपचा गळा, व्हायरल व्हिडीओमुळे खळबळ; पाहा व्हिडीओ

शिवजयंतीनिमित्त सयाजी शिंदेंचा नवा संकल्प, तुम्हालाही वाटेल अभिमान!

डोक्यात गोळी मारत गोल्डमॅनला संपवलं, दिवसाढवळ्या भर चौकात गोळीबार!

“भाजपच्या ताटातील उरलेलं खरकटं खाऊन शिवसेना पोट भरतेय”

टाटा देतंय भन्नाट ऑफर!! आता 80 हजारात आणा ही कार..

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या