मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आज(10 जून) 20 वा वर्धापनदिन आहे. यंदाच्या वर्धापनदिनाला राष्ट्रवादीने ‘पाणी वाचवा, दुष्काळ हटवा’ हा संदेश दिला आहे.
महाराष्ट्राला यंदाच्या वर्षी प्रचंड मोठ्या दुष्काळाला सामोरे जावं लागत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीने ‘पाणी वाचवा, दुष्काळ हटवा’ हा संदेश जलदिंडीच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न केला आहे.
राष्ट्रवादी यंदाचा वर्धापन दिन जलदिन संकल्प म्हणून साजरा करत आहे. महाराष्ट्राची भूमी सुजलाम सुफलाम व्हावी, महाराष्ट्रात दुष्काळ पडू नये यासाठी आगामी काळात राष्ट्रवादी काम करणार आहे, असं पक्षाच्या वतीने सांगण्यात आलं आहे.
दरम्यान, राष्ट्रवादीने 20 व्या वर्धापनदिनाचं औचित्य साधत राज्यभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं आहेत.
वर्धापन दिनी जलदिन संकल्प करून पाणी वाचवा दुष्काळ वाचवा, दुष्काळ हटवा घोषणेसह कुलाबा ते चव्हाण प्रतिष्ठानपर्यंत जलदिंडी काढण्यात आली. जल पालखीचे भोई होऊन आ. @Jayant_R_Patil , आ. @ChhaganCBhujbal सह ज्येष्ठ नेत्यांनी पाण्याचा संदेश सर्वदूर पोहचवण्याचा प्रयत्न केला.#NCPturns20 pic.twitter.com/Effhzh956Y
— NCP (@NCPspeaks) June 10, 2019
महत्वाच्या बातम्या
-“पराभवाची चर्चा बस्स करा; आता विधानसभेच्या तयारीला लागा”
“महाराष्ट्रात पृथ्वीराज चव्हाणांमुळे काँग्रेसची वाताहत”
-“विधानसभेला शिवसेनेबरोबर युती कायम पण मुख्यमंत्री भाजपचाच झाला पाहिजे”
-धक्कादायक! अभ्यास दौऱ्यावर गेलेल्या 4 आमदारांचा तरुणीसोबतचा अश्लील डान्स व्हायरल
-…म्हणून मी निवडून आलो; इम्तियाज जलील यांनी सांगितलं विजयामागचं कारण
Comments are closed.