‘…तर मी सरकारमधून बाहेर पडेन’; ‘या’ बड्या नेत्याची धमकी

Mahayuti | महायुती सरकारमधील अजित पवार गटाच्या मंत्र्याने महायुती (Mahayuti) सरकारमधून बाहेर पडण्याची धमकी दिली आहे. आरक्षणाच्या विषयावर या मंत्र्याने स्पष्ट भूमिका घेतली आहे.

मंत्र्याची सरकारमधून बाहेर पडण्याची धमकी

गडचिरोलीतून येणारे आमदार आणि कॅबिनेट मंत्री धर्मराव आत्राम यांनी महायुतीच्या सरकारमधून बाहेर पडण्याच इशारा दिला आहे. धनगर समाजाला आरक्षण दिल्यास मी महायुतीच्या (Mahayuti) सत्तेतून बाहेर पडणार, अशी प्रतिक्रिया धर्मराव आत्राम यांनी दिलीये.

आत्राम हे गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी विधानसभा क्षेत्रातील आमदार आहेत. सध्या ते कॅबिनेट मंत्री आहेत. आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा देण्यासाठी तयार असून कुठे ना कुठे धनगर समाजाला आरक्षण देण्याच्या विरोधात आत्राम असल्यात दिसत आहे.

धर्मरावबाबा आत्राम यांची कन्या भाग्यश्री आत्राम यांनी विधानसभेत वडिलांच्या विरोधात रणशिंग फुंकले आहे. त्यामुळे विधानसभेत वडील विरुद्ध मुलगी असा सामना रंगण्याची शक्यता आहे.

भाग्यश्री आत्राम यांनी ‘घड्याळ’ सोडून शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करुन ‘तुतारी’ फुंकण्याचा निर्णय घेतला आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत त्या रिंगणात उतरण्याचे संकेत मिळत आहेत. भाग्यश्री आत्राम शरद पवार गटात जाण्याची कुणकुण पिताश्री धर्मराव बाबा यांना आधीच लागली होती. त्यामुळेच अजित पवारांची जनसन्मान यात्रा अहेरीत आली असतानाच, त्यांनी लेकीवर टीकेची झोड उठवली होती.

विरोधकांनी माझ्या लेकीला हाताशी घेत पक्ष फोडण्याचं काम सुरु केलं आहे. पण जी मुलगी बापाची होऊ शकली नाही, ती तुमच्या पक्षाची काय होणार? माझ्याकडेही दुधारी तलवार आहे. माझ्या वाटेला जाल, तर म्यानातून तलवार बाहेर काढेन. एक मुलगी गेली तरी दुसरी मुलगी आणि एक मुलगा माझ्याकडे आहेत. आत्राम घराणं हलगेकर यांना नदीत टाकल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा धर्मरावबाबा आत्राम यांनी भरसभेतून दिला होता. त्यावेळी अजित पवारही व्यासपीठावरच उपस्थित होते.

महत्त्वाच्या बातम्या- 

शरद पवारांनी सांगितली रणनीती, उमेदवार ठरवण्याचा अधिकार फक्त ‘त्या’ तिघांना

राज्यातील ‘या’ भागात मुसळधार पावसाचा इशारा

पवारांच्या तुतारीला पिपाणीमुळे फटका, चिन्हाबाबत कोणता निर्णय घेणार?

मारुतीची सर्वात स्वस्त कार ‘या’ दिवशी होणार लाँच

महाराष्ट्रातील 11 राजकीय पक्षांने निवडणूक आयोगाने केल्या ‘या’ मागण्या!