Top News अकोला महाराष्ट्र

राष्ट्रवादीचा ‘हा’ आमदार सरकारलाच नडला, गुन्हा दाखल झाला पण शिवजयंती साजरी केलीच!

Photo Credit- Twitter video screenshot amol Mitakari

अकोला | राज्यात आज मोठ्या थाटामाटात शिवजयंती उत्सव साजरा झाला. यंदाच्या वर्षी राज्य सरकारने काही निर्बंध लावले होते. मात्र राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांच्यावर शिवजयंतीनिमित्त मिरवणूक काढल्याप्रकरणी यांच्यासह 400 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आल्याचं वृत्त एबीपी माझाने दिलं आहे.

शिवजयंती साजरी करताना शंभर व्यक्तींच्या उपस्थितीत शिवजयंती साजरी करावी, बाईक रॅली किंवा मिरवणूक काढू नये, इ. निर्बंध सरकारने लावले होते. मात्र राष्ट्रवादीचे विधान परिषदेचे आमदार अमोल मिटकरी यांनीही सरकारच्या नियमांना केराची टोपली दाखवली. अकोल्यातील कुटासा गावात ही घटना घडली आहे. त्यासोबतच विरोधी पक्ष भाजप आणि मनसेनेही सरकारने लावलेल्या निर्बंधावरून टीका केली होती.

दरवर्षी शिवजन्मस्थळ शिवनेरीवर महाराष्ट्र सरकारतर्फे शासकीय शिवजयंती साजरी केली जाते. मात्र यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारनेही मोजक्या लोकांच्याच उपस्थितीत शिवजयंती साजरी केली. यावेळी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री, राज्यसभेचे खासदार संभाजीराजे भोसले, शिरूरचे खासदार अमोल कोल्हे, आमदार अतुल बेनके आणि आदि उपस्थित होते. शिवनेरीवर पार पडलेल्या सोहळ्यावरून भाजप नेते निलेश राणे यांनी सरकारवर टीका केली.

दरम्यान, शिवनेरी किल्ल्यावर सामान्य शिवभक्तांना 144 कलम लागू केला आणि मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री हेलिकॉप्टरने गेले. शिवभक्तांचा हा अपमान महाराष्ट्र कधीही विसरणार नाही. त्यासोबतच शिवरायांच्या पालखीला शिवाजी महाराजांच्या गादीचे वंशज छत्रपती संभाजी राजे यांना साधा हातही लावायला दिला नाही. हा छत्रपतींच्या गादीचा अपमान असल्याचं निलेश राणे म्हणाले.

थोडक्यात बातम्या-

कोरोना रुग्णांची संख्या वाढतेय पण प्रसिद्ध डॉ. तात्याराव लहानेंनी दिली दिलासादायक माहिती

लाल महालासमोर गायला पोवाडा, या प्रसिद्ध शाहीराला पुण्यात अटक

जिओकडून सर्वात स्वस्त प्लॅनची घोषणा, अनलिमिटेड कॉलिंगसह नेटही मिळणार!

‘सरकारचं शिवाजी महाराजांवरचं प्रेम डुप्लिकेट कारण…’; निलेश राणेंची टीका

कोरोनाच्या रुग्णसंख्येत आज धक्कादायक वाढ, लोकहो काळजी घ्या

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या