बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

राष्ट्रवादीचे आमदार अनिल भोसलेंना 6 मार्चपर्यंत पोलीस कोठडी

पुणे | पुण्यातील शिवाजीराव भोसले सहकारी बँक घोटाळ्याप्रकरणी बँकेचे संचालक आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानपरिषदेचे आमदार अनिल भोसले यांच्यासह चौघांना पुणे जिल्हा सत्र न्यायालयाने 6 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

अनिल भोसले यांच्यासह सूर्याजी जाधव, कैलास भोसले आणि तानाजी पडवळ या चौघांना काल रात्री अटक करण्यात आली होती. त्यानंतर आज दुपारच्या सुमारास पुणे जिल्हा सत्र न्यायालयात हजर करण्यात आलं.

शिवाजीराव भोसले सहकारी बँकेच्या व्यवहारासंदर्भात पोलीस चौकशी सुरू आहे. त्यामुळे अटक करण्यात आलेल्या आरोपींना पोलीस कोठडी देता कामा नये कारण ते पोलिस यंत्रणेला सहकार्य करत आहेत, असं बचावपक्षाने म्हटलं आहे.

दरम्यान, शिवाजीराव भोसले सहकारी बँक प्रकरणी ठेवीदारांची कोट्यवधी रूपयांची फसवणूक करण्यात आली आहे. त्यामुळे अटक करण्यात आलेल्या आरोपींच्या अधिक चौकशीसाठी पोलीस कोठडी मिळावी, असं सरकारी पक्षाने म्हटलंय.

ट्रेंडिंग बातम्या- 

“दिल्लीत दुसऱ्यांदा 1984 ची पुनरावृत्ती होऊ देणार नाही”

भाजपचे खासदार संजय काकडे राष्ट्रवादीच्या वाटेवर??

महत्वाच्या बातम्या- 

“महिलांचा लैंगिक छळ आणि बलात्कार केल्यास फाशी होणार”

मराठी भाषा खऱ्या अर्थाने शक्ती आणि भक्तीची- मुख्यमंत्री

खरं बोललो तर किती त्रास होतो ते आम्हालाच माहिती- इंदोरीकर महाराज

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More