‘त्या’ वादावर राष्ट्रवादीच्या आमदारांकडून पडदा टाकण्याचा प्रयत्न!

कोल्हापूर | डीवायएसपी सुरज गुरव हे माझ्या मुलासारखे आहेत, आपण त्यांना मोठ्या मनाने माफ करूया, असं विधान करून राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफ यांनी काही दिवसांपूर्वी घडलेल्या डीवायएसपी सुरज गुरव यांच्याबरोबरच्या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे.

काही दिवसांपूर्वी डीवायएसपी सुरज गुरव यांनी हसन मुश्रीफ यांना महापालिकेत जाण्यापासून रोखलं होतं. त्यावेळी डीवायएसपी सुरज गुरव आणि मुश्रीफ यांच्यात जोरदार बाचाबाची झाली होती.

यावेळी डीवायएसपी सुरज गुरव यांनी हसन मुश्रीफ यांना ‘साहेब आम्ही नोकरी करतोय, राजकारण नाही’…  असे खडे बोल सुनावले होते.

दरम्यान, राज्यभरातून डीवायएसपी सुरज गुरव यांच्यावर कौतुकाचा वर्षाव झाला होता. मात्र या वादावर आता हसन मुश्रीफ यांच्या विधानाने पडदा पडण्याची शक्यता आहे.

महत्वाच्या बातम्या 

-राज ठाकरे म्हणजे विझलेला दिवा – आमदार वारिस पठाण

-RAFALE DEAL: कोर्टाच्या निर्णयावर अनिल अंबानींना आनंदी आनंद गडे, वाचा पहिली प्रतिक्रिया

-भारतीय नव्या नोटांना नेपाळने घातली बंदी

-जिजाऊंचा उल्लेख छत्रपती शिवाजी महाराजांच्या ‘पत्नी’; शिक्षण विभागाचा भोंगळ कारभार

-राफेल कराराबाबत न्यायालयाचा मोठा निर्णय