बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

राष्ट्रवादीचा आमदार अन् पुतण्यामधील प्रकरण, ‘या’ कारणामुळे कांड घडल्याची जोरदार चर्चा

पुणे | पुणे जिल्ह्यातील खेड-आळंदी विधानसभा मतदारसंघाचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांना हनी ट्रॅपमध्ये अडकवण्याचा डाव उघडकीस आल्याने एकच खळबळ माजली आहे. या प्रकरणात आमदारांचा निकटवर्तीय आणि भावकीतील शैलेश मोहिते पाटील याचं नाव आल्याने सर्वांनाच धक्का बसला आहे.

या प्रकरणात सातारा पोलिसात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 2009 साली दिलीप मोहिते पाटील विधानसभेत आमदार म्हणून निवडून गेले. त्यानंतर 2014 ला त्यांना पराभव पत्करावा लागला. यावेळी शैलेश मोहिते पाटील याने दिलीप मोहिते यांचा प्रचाराची सूत्रे सांभाळली होती. त्यानंतर दिलीप मोहिते-पाटील आणि शैलेश मोहिते यांच्यामध्ये काही कारणाने मतभेद झाले आणि त्यांचा वाद टोकाला गेला.

2019 च्या विधानसभा निवडणुकीत दिलीप मोहिते पाटील हे विधानसभेवर आमदार म्हणून निवडून गेल्याने शैलेश मोहिते पाटील नाराज होता. त्याच्याकडे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचं सरचिटणीस पद आहे व त्याने स्वतः आमदार होण्यासाठी चारही बाजूंनी प्रयत्न करत असल्याचं समोर येत आहे. राजकारणात कधी काय होईल आणि कोण कधी काय करेल हे सांगता येत नाही, असंच काहीसं या प्रकरणात घडलं.

आमदारकी मिळवण्यासाठी हे हनी ट्रॅप प्रकरण करून दिलीप मोहिते यांना बदनाम करण्याचा कट शैलेशने रचला नाही ना?, अशा चर्चानी सध्या चांगलाच जोर धरला आहे. दरम्यान, खेड-आळंदी मतदारसंघात कधीकाळी एकत्र काम करून विरोधकांवर टीकेची झोड उठवणारे आता मात्र एकमेकांचे कट्टर विरोधक झाल्याचं दिसून येत आहे. या प्रकरणात स्पष्टीकरण देताना आमदार दिलीप मोहिते यांनी शैलेश मोहिते हा आमच्या गावातला आहे, पण त्याचा आमचा काही संबंध नाही, असं बोलून दाखवलं. तसेच संबंधित माहिती देणारी तरुणीही साताऱ्यातली आहे आणि ते माझं कार्यक्षेत्र नाही, त्यामुळे ती माझ्या ओळखीची असण्याचा प्रश्नच नाही, मला माझ्या पुतण्याने मयूर मोहितेने सांगितल्यानंतर हे सर्व कळलं असंही त्यांनी यावेळी बोलून दाखवलं.

थोडक्यात बातम्या  –

#सकारात्मक_बातमी | वृद्धाश्रमातील वृद्धांची कमाल, 46 जणांनी कोरोनाला हरवलं!

पुण्यातील राष्ट्रवादीच्या आमदाराला हनिट्रॅप करण्याचा डाव, पुतण्याचंच नाव आल्यानं मोठी खळबळ

18 ते 45 वयोगटातील नागरिकांना मोफत लस देणार; ठाकरे सरकारची मोठी घोषणा

रविवारपासून या ‘चार’ भागात विजेच्या कडकडाटासह पावसाची शक्यता

‘थोडी तरी लाज बाळगा’; परदेशी गेलेल्या सेलिब्रिटींना नवाजुद्दीनने झापलं

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More