महाराष्ट्र मुंबई

‘ऑपरेशन लोटस’ इथे शक्य नाही’, संकट काळात सोडून गेले नाही ते आता कसे जातील?- नवाब मलिक

मुंबई |  संकट काळात सोडून गेले नाही ते आता कसे जातील?, असा सवाल करत राष्ट्रवादीचे  12 आमदार भाजपच्या संपर्कात आहेत, या सगळ्या अफवा असल्याचं स्पष्टीकरण राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री नवाब मलिक यांनी दिलं आहे.

महाराष्ट्रात ऑपरेशन लोटस होणार नाही किंबहुना ते शक्यही नाही. 55 ते 60 आमदारांनी राजीनामा देऊन सत्तापरिवर्तन होऊ शकते. त्याशिवाय सत्तापरिवर्तन होणार नाही आणि संकट काळात सोडून गेले नाही ते आता कसे जातील?, असा उलट सवाल नवाब मलिक यांनी उपस्थित केला.

भाजपला फोडाफोडीच्या राजकारणात रस असेल तर आम्हीही येत्या काळात राष्ट्रवादीतून भाजपात गेलेल्या नेत्यांची घरवापसी करण्याचा विचार करू. काही नेते तसंच आमदार शरद पवारांना तसंच अजितदादांना भेटत आहेत. संबंधितांना पक्षात परत घेण्याविषयी चर्चा सुरू आहे लवकरच निर्णय घेण्यात येईल, असंही मलिक यांनी सांगितलं.

काही लोक राष्ट्रवादी काँगेस पक्षाचे 12 आमदार भाजपात जाण्याची अफवा पसरवत आहे. हे वृत्त खोटं आहे. उलट निवडणुकीआधी भाजपात गेलेले आमदार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात येण्यास उत्सुक आहेत. पण यावर अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही, असं ट्विट करून नवाब मलिक यांनी स्पष्ट केलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

माझ्या जीवाचं बरंवाईट झाल्यास तहसिलदारांचे पतीच जबाबदार- दिलीप मोहिते पाटील

भारतीय हॉकी संघातील आणखी एक खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह

अयोध्येतील राम मंदिराच्या निर्माणाला पार्थ पवार यांच्या शुभेच्छा, म्हणाले…

पार्थ पवारांच्या राम मंदिर निर्माणाला शुभेच्छा, सुप्रिया सुळे म्हणाल्या…

सुशांतसिंह आत्महत्या प्रकरण; “संजय राऊत अन् आदित्य ठाकरेंची नार्को टेस्ट करा”

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या