मुंबई | कोरोना व्हायरसने सर्व जगभरात हैदोस घातला आहे. अनेक राष्ट्रांची अर्थव्यवस्था कोलमडू लागली आहे. कोरोना व्हायरसन आपल्या देशातही सध्या मोठ्या प्रमाणात वाढत चालला आहे. राज्यातही कोरोनाग्रसतांची संख्या वाढू लागली आहे. अशातच राष्ट्रवादी काँग्रसेचे आमदार आणि मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी सेल्फ क्वारंटाईनचा निर्णय घेतला आहे.
आव्हाड कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या पोलिसाच्या संपर्कात आल्यानं त्यांनी हा घेतला निर्णय घेतला असल्याची माहिती आहे. अलीकडेच जितेंद्र आव्हाड यांची सोलापूरच्या पालकमंत्रीपदी निवड करण्यात आली. त्यामुळे त्यांनी आत्ता सोलापूरसह अनेक दौरे केले.
लोकप्रतिनिधी असल्याने मंत्र्यांना आपल्या राज्यातील जनतेच्या संपर्कात जावून तेथील माहिती घेऊन कामं करावी लागतात. सध्या कोरोना व्हायरस वाढत असल्याने मंत्रीसुद्धा दौरे करून बैठका घेऊन राज्यातून कोरोनाला पिटाळून लावण्यासाठी अनेक उपाययोजना करत आहेत.
दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या घराजवळ म्हणजेच मातोश्री’पाशी असलेल्या चहा वाल्याला कोरोना झाला होता. तिथे मुख्यमंत्र्यांचे अंगरक्षक गेले असल्याने मागे त्यांना क्वारंटाईन करण्यात आलं होतं.
ट्रेंडिंग बातम्या-
मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला प्रतिसाद; मुख्यमंत्री सहायता निधीत जमा झाले इतके कोटी रुपये
कुठलीही महाविद्यालयीन परीक्षा रद्द होणार नाही, परीक्षा होणारच- उच्च-तंत्रशिक्षण मंत्री
महत्वाच्या बातम्या-
लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर भारतीय रेल्वेने घेतला मोठा निर्णय
मुस्लिमांच्या बदनामीचा प्रयत्न होत आहे- ओवैसी
कोरोनाच्या लढ्यात सुनिल गावसकरांकडून 59 लाख रूपये पण मदतीचा गवगवा नाही
Comments are closed.