बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

राष्ट्रवादीचे आमदार उदयनराजेंच्या भेटीला; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

सातारा | राष्ट्रवादीच्या (NCP) आमदाराने खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhonsle) यांची भेट घेतल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. किसनवीर सहकारी साखर कारखान्याची निवडणूक जिंकल्यानंतर राष्ट्रवादीचे आमदार मकरंद पाटील (Makarand Patil) यांनी उदयनराजेंच्या निवासस्थानी जात त्यांची भेट घेतली.

किसनवीर साखर कारखान्याच्या निवडणुकीत उदयनराजेंच्या कार्यकर्त्यांनी मकरंद पाटील यांची बरीच मदत केली असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे मकरंद पाटील यांनी अचानक जलमंदीर गाठत उदयनराजेंची भेट घेऊन त्यांचे आभार मानले, अशा चर्चा सध्या ऐकायला मिळत आहेत.

या भेटीत मकरंद पाटील व उदयनराजे भोसले यांच्यात सुमारे 20 मिनिटे चर्चा झाली. मात्र, या दोघांमध्ये नेमकं कोणत्या विषयावर चर्चा झाली याचं गुढ कायम आहे. असं असलं तरी या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

दरम्यान, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) व उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) रविवारी साताऱ्यात आहेत. या दोघांच्या दौऱ्याच्या पूर्वसंध्येलाच मकरंद पाटील व उदयनराजे यांच्यातील ही भेट महत्त्वाची मानली जात आहे. त्यामुळे या भेटीवर पवारांकडून काय प्रतिक्रिया येणार हे बघावं लागेल.

थोडक्यात बातम्या-

’14 तारखेला अनेकांचे मास्क उतरवणार’; मुख्यमंत्र्यांचा आक्रमक पवित्रा

“आता या सरकारचा बुरखा टराटरा फाडला पाहिजे”

मोठी बातमी ! टाटा स्टील प्लांटमध्ये भीषण आग, अनेकजण जखमी

मोठी बातमी ! KGF फेम अभिनेत्याचं निधन, 54 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

“ओबीसी आरक्षणाला ग्रहण देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमुळे लागलंय”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More