अजित पवारांचा ‘हा’ आमदार शरद पवारांच्या भेटीला, कारण आलं समोर

Sharad Pawar

Sharad Pawar | राज्यातील विधानसभेच्या निकालाने महाविकास आघाडीचं पाणीपतं झाल्याचं पाहायला मिळत आहे. कारण, राज्यात भाजप महायुतील तब्बल 236 जागांवर स्पष्ट बहुमत मिळालं असून भाजप हा सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. अशात सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग आलेला असताना अजित पवारांचा आमदार शरद पवारांच्या (Sharad Pawar) भेटीला पोहोचला आहे.

वळसे पाटील शरद पवारांच्या भेटीला

मुंबईच्या वाय. बी. चव्हाण सेंटर येथे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते दिलीप वळसे पाटील हे आले. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या. ते शरद पवार यांच्या भेटीसाठी आले होते. इथे मी पवार साहेबांची भेट घेणार आहे. काही नाही, फक्त नमस्कार करणार. राजकीय चर्चा नाही. फक्त प्रतिष्ठानची बैठक आहे. त्या बैठकीसाठी मी आलो आहे, असं दिलीप वळसे पाटील यांनी स्पष्ट केलं.

वळसे पाटलांचा निसटता विजय

राष्ट्रवादीच्या फुटीनंतर दिलीप वळसे पाटील यांनी शरद पवारांची (Sharad Pawar) साथ सोडली आणि अजित पवारांसोबत गेले. यामुळे पवारांसह अनेकांना धक्का बसल्याची चर्चा होती.

विधानसभेला दिलीप वळसे पाटलांच्या विरोधात आंबेगावातून शरद पवार गटाचे देवदत्त निकम निवडणुकीला उभे होते. त्यावेळी वळसे पाटील यांचा गद्दार असा उल्लेख करून त्यांना पाडा असं आवाहन शरद पवारांनी केलं होतं.

अखेर अटीतटीच्या या लढतीत दिलीप वळसे पटील यांचा निसटता विजय झाला. ते अवघ्या हजार मतांनी विजयी झाले.

महत्त्वाच्या बातम्या- 

महाराष्ट्रात थंडी वाढणार की कमी होणार? IMD ने वर्तवला अंदाज

पुढील सहा महिन्यांत पुन्हा निवडणुका होणार?

उद्धव ठाकरेंनी घेतला मोठा निर्णय, आदित्य ठाकरेंवर मोठी जबाबदारी

मुख्यमंत्री कोण होणार?; सर्वात मोठी अपडेट समोर

अखेर अभिषेकने ऐश्वर्यावर भाष्य केलं, चर्चांना उधाण

Join WhatsApp

Join Now

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .