बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

राष्ट्रवादीच्या आमदारानं उडवली संजय राऊतांची खिल्ली, म्हणाले मी तर आता घाबरलो!

पुणे | महाराष्ट्रात तीन पक्षांनी मिळून महाविकास आघाडी सरकार स्थापन केलं पण या सरकारमधील अनेक नेत्यांमध्ये मतभेद असल्याचं अनेक वेळा पाहायला मिळालं. अनेक वेळा महाविकास आघाडी सरकारमधील नेते एकमेकांवर टीकाटिप्पणी करत असताना पाहायला मिळतात. त्यातच आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदाराने थेट शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यावर उपरोधिक टीका करत खिल्ली उडवली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पुणे जिल्ह्यातील खेडचे आमदार दिलीप मोहिते यांनी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यावर टीका केली. ‘संजय राऊत हे मोठे नेते आहेत, गल्लीपासून दिल्लीपर्यंत कोणावरही बोलण्याचा त्यांच्याकडे परवाना आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही ते धमकी देऊ शकतात. त्यामुळे त्यांनी मला माझ्या मतदारसंघात येऊन धमकी दिल्याने मला त्यांची भीती वाटते’, अशा शब्दात मोहिते यांनी उपरोधात्मक टीका केली आहे.

दरम्यान, खेड पंचायत समितीमधील शिवसेनेच्या सभापतींवर आलेल्या अविश्वास ठरावाबाबत भूमिका स्पष्ट करताना खासदार संजय राऊत यांनी खेडचे आमदार दिलीप मोहिते यांच्यावर खरमरीत टीका केली होती. तसेच अजित पवारांनी मोहितेंचा बंदोबस्त करावा नाहीतर शिवसेनेला मुभा द्यावी, अशा शब्दात आमदार मोहितेंवर टीकेचे बाण सोडले होते.

या सर्व प्रकरणात आता खेडचे आमदार दिलीप मोहिते यांनी प्रत्युत्तर देत माझ्यावर टीका करण्यापूर्वी संजय राऊत यांच्यासारख्या मोठ्या नेत्यानी माझ्याशी वैयक्तिक बोलून वस्तुस्थिती जाणून घ्यायला हवी होती, असं म्हटलं आहे. तसेच संजय राऊत हे पंतप्रधान नरेंद्र मोदींना धमक्या देतात, त्यामुळे मी घाबरलो आहे आणि सरकारला मला आता पोलिस संरक्षण द्यावं लागेल, अशी उपरोधिक टीकाही केली आहे.

थोडक्यात बातम्या – 

सनी शॉटसाठी तयार होत असताना मागून एकाने…; व्हिडीओ पाहून तुम्हीही पोट धरून हसाल

कौतुकास्पद! पुण्यात प्रथमच घरोघरी जाऊन लसीकरण करण्याचा उपक्रम

पुण्यात सोमवारपासून नवे नियम लागू; जाणून घ्या काय सुरु, काय बंद?

PPE किट घालून ‘या’ पक्षाच्या कार्यकर्त्यांनी भाजप कार्यालयासमोर केलेलं आंदोलन ठरलं लक्षवेधी

आनंदाची बातमी! पुण्याची वाटचाल कोरोनामुक्तीकडे, वाचा आजची दिलासादायक आकडेवारी

 

Shree

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More