अहमदनगर महाराष्ट्र

माझं दैवत गेलं…. अनिलभैय्यांच्या जाण्याने राष्ट्रवादीचा आमदार ढसाढसा रडला…!

अहमदनगर |  तमाम शिवसैनिकांच्या मनावर राज्य करणारे शिवसेनेचे माजी मंत्री तसंच अहमदनगरमधून शिवसेनेच्या तिकीटावर सलग 25 वर्ष आमदार राहिलेले अनिल भैय्या राठोड यांचं काल सकाळी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झालं. त्यांच्या निधनाचं वृत्त कळताच पारनेरचे राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांना धक्काच बसला अन् ते ढसाढसा रडायला लागले.

अनिलभैया राठोड हे आमचे सर्वांचे दैवत होते. अनिलभैय्या ही एक आगळीवेगळी शक्ती होती. त्यांनी नगर जिल्ह्यातील गोरगरीब जनतेला उभं करण्याचं, त्यांना ताकद देण्याचं काम केलं. त्यांच्या जाण्यामुळं आम्ही पोरके झाले आहोत, अशी भावूक प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांनी दिली.

अनिल भैय्यांच्या आशीर्वादामुळेच मी आमदार आहे. राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवत असताना देखील त्यांनी मला आशीर्वाद दिले होते. नगर जिल्ह्यातील सर्वपक्षीयांच्या, शेतकरी बांधवांच्या व जनतेच्या वतीनं मी भैयांना आदरांजली अर्पण करतो, असं लंके म्हणाले.

निलेश लंके शिवसेनेत असताना अनिल भैय्या अन् त्यांचे अतिशय जवळचे आणि सलोख्याचे संबंध होते. लंकेंनी शिवसेना सोडली अन् राष्ट्रवादीची वाट धरली मात्र त्यांच्या संबंधामध्ये तसूभरही फरक पडला नाही.

महत्त्वाच्या बातम्या-

भूमीपूजन सोहळा पार पडल्यानंतर पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना फोन, म्हणाले….

धक्कादायक! सांगली जिल्हा कारागृहातील तब्बल 63 कैद्यांना झालीय कोरोनाची लागण

राम मंदिरावर ज्येष्ठ भाजप नेते आणि केंद्रिय मंत्री गडकरींची पहिली प्रतिक्रिया

बरं झालं उद्धव ठाकरेंना भूमीपूजन सोहळ्याचं आमंत्रण मिळालं नाही, नाहीतर…- गिरीश महाजन

आयुष्यात पहिल्यांदा एवढं पाणी पाहतोय, मुंबईच्या पावसाने शरद पवार आश्चर्यचकित!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या