बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘मी एकट्याने पाप केलं असेल तर…’; माफी मागत राष्ट्रवादीचे आमदार ढसाढसा रडले

हिंगोली | हिंगोली जिल्ह्यातील वसमत येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा बसवण्यात येणार आहे. आज शहरामध्ये महाराजांच्या पुतळ्याचं आगमन झालं आहे. यावेळेस महाराजांच्या पुतळ्याचं स्वागत करताना राष्ट्रवादीचे आमदार राजू नवघरे यांनी अश्वारूढ पुतळ्यावरून चढून हार घातला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना पुतळ्यावर चढून हार घातल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांना पुतळ्यावर चढून हार घातल्यामुळे राजू नवघरे यांच्या या कृत्याचा निषेध सर्व स्तरातून व्यक्त करण्यात येत आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर आपल्याकडून मोठी चूक झाली आहे हे राजू नवघरे यांच्या लक्षात आलं. यावर बोलताना राजू नवघरे अश्रू अनावर झाले आहेत. त्यांनी सर्व शिवप्रेमींची माफी मागितली आहे.

माझ्यासोबत अनेक जण छत्रपती शिवाजी महाराजांना हार घालण्यासाठी घोड्यावर चढले होते. तर माझ्या एकट्यावर टीका का? असा प्रश्न राजू नवघरे यांनी केला आहे. मी एकट्याने पाप केलं असेल तर मला फाशी द्या, असंही त्यांनी म्हटलं आहे. ‘मला माझी चूक लक्षात आली आहे त्यामुळे मला माफ करा’, असं म्हणत त्यांनी सर्व शिवप्रेमींची माफी मागितली आहे.

दरम्यान, वसमत येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा 14 फुटी भव्य पुतळ्याची स्थापना करण्यात येणार आहे. महाराजांचा हा पुतळा पंचधातुने बनवण्यात आला आहे. शिवरायांच्या या पुतळ्याच्या स्वागतावेळी राजू नवघरे यांनी घोड्यावर चढून पुष्पाहार अर्पण केला होता. त्यामुळे राजू नवघरे यांच्याविरोधात संताप व्यक्त केला जात आहे.

थोडक्यात बातम्या-

फिरसे मौका मौका! भारत-पाकिस्तान सामन्याच्या प्रोमोची तुफान चर्चा; पाहा व्हिडीओ

‘शरद पवार 4 वेळी मुख्यमंत्री होते पण…’; देवेंद्र फडणवीसांचा शरद पवारांना टोला

मोठी बातमी! माजी पंतप्रधान मनमोहन सिंग एम्स रूग्णालयात दाखल

“शरद पवारांचा न्यायालयावर विश्वास आहे की नाही?”

“सात दिवस झालं टोटल सुरु मात्र हिशोब लागत नाहीये”

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More