बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

राज ठाकरे भाजपच्या विरोधात बोलले होते की राष्ट्रवादीच्या हे…- रोहित पवार

नवी दिल्ली | गेल्या काही दिवसांपासून मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये वाद रंगताना दिसत आहे. राष्ट्रवादीच्या जन्मापासून महाराष्ट्रात जातीवाद वाढला, असं वक्तव्य मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलं होतं. त्यानंतर मनसे आणि राष्ट्रवादी यांच्यात शाब्दिक युद्ध रंगलं. त्यावर आता राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी भाष्य केलं आहे.

राज ठाकरेंची लाव रे व्हिडीओ ही घोषणा मला एकट्यालाच नाही तर, भाजपच्या अनेक लोकांना आठवत आहे. केंद्रातील भाजप सरकार आणि राज्यातील भाजप सरकार विरोधात राज ठाकरे खूप वेगळ्या पद्धतीने बोलले. राज ठाकरेंच्या वक्तव्यांना दोन बाजू असतात. राष्ट्रवादी, काँग्रेस आणि मित्रपक्ष विकासाच्या मुद्द्यावरून लढणारे लोक आहेत, असं राज ठाकरे यांचं म्हणणं असू शकतं, असं रोहित पवार म्हणाले आहेत.

राष्ट्रवादी सत्तेत असताना यांना सत्तेतून खाली पाडायण्यासाठी भाजपाकडे विकासाचा मुद्दा नव्हता. त्यामुळे जातीवाद वाढवण्यात आला असावा. मग अशा हेतूतून राज ठाकरे राष्ट्रवादीच्या विरोधात बोलत होते की भाजपाच्या हे सांगता येणार नसल्याचं देखील रोहित पवार यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, राज ठाकरे यांच्या वक्तव्याकडे खोलात जाऊन पाहिलं तर त्यांच्या वक्तव्याचा वेगळा अर्थ निघू शकतो, असंही रोहित पवार म्हणाले आहेत. तर याआधी शरद पवारांनी देखील राज ठाकरे यांनी प्रबोधनकार ठाकरे यांची पुस्तकं वाचावीत, असा सल्ला दिला होता.

थोडक्यात बातम्या-

उद्धव ठाकरेंची लोकप्रियता ही ममता बॅनर्जी आणि स्टॅलिन यांच्या तोडीची- जावेद अख्तर

पिल्लाचा मृतदेह सोंडेत घेऊन फिरताना दिसली हत्तीण, डोळ्यात पाणी आणणारा व्हिडीओ व्हायरल

“तुम्ही गाणं म्हटलं की कलाकार आणि लोककलावंतानी म्हटलं की नाचे”

उदयनराजे भोसलेंचा शिवेंद्रसिंहराजेंना टोला, म्हणाले…

देवेंद्र फडणवीसांनी ‘ते’ परिपत्रक काढलं म्हणून ओबीसी आरक्षण धोक्यात आलं- नाना पटोले

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More