बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘किमान संकट काळात तरी राजकारण करू नका’; रोहित पवारांनी भाजप नेत्यांना फटकारलं

मुंबई | महाराष्ट्रात सध्या लस वितरणावरून राजकारण होताना दिसत आहे. त्यातच राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी विरोधकांना राजकारण न करण्याची विनंती केली आहे. किमान संकट काळात तरी राजकारण करू नका. सरकार पडणार नाहीच पण ते पडावं यासाठी आपण जेवढे शर्थीचे प्रयत्न करत आहात, तेवढं राज्याच्या हितासाठी करा, असं आवाहन रोहित पवार यांनी केलं आहे.

लस वितरण लोकसंख्येच्या आधारावर होत नसूनही विरोधक महाराष्ट्राची तुलना उत्तर प्रदेशशी करत आहेत. महाराष्ट्राला 1.06 कोटी डोस मिळाले. आज आपल्याकडे 10 लाख डोस शिल्लक असून ते परवापर्यंत संपेल. केंद्र सरकारच्या गृहितकानुसार वेस्ट रेट हा 10% असू शकतो,पण आपण तो अवघा 3% ठेवला. राज्यातील रुग्णसंख्या बघता लस पुरवठा किती व्हावा, याचा विरोधकांनी विचार करावा, असा टोला देखील रोहित पवार यांनी लगावला.

वास्तविक आपण लसीकरणाचा वेग वाढवलाय. लसीकरण केंद्रावर नोंदणी केल्यानंतर अवघ्या पाच-दहा मिनिटात लस दिली जातेय. पण मागणीच्या प्रमाणात पुरवठा लस उपलब्ध नसल्याने लसीकरणामध्ये अडथळा निर्माण होतो. अशा परिस्थितीत लसीकरणाचा वेग अजून किती वाढवायचा? केंद्राकडून लसींचा पुरवठा वाढवून मिळावा यासाठी प्रयत्न करणं हे राजकारण आहे का? राज्याला तातडीने अधिक लस मिळाव्यात याला विरोध आहे का?, असा सवाल त्यांनी उपस्थित केेला.

दरम्यान, केंद्र सरकारने महाराष्ट्राला किती आणि कशी मदत केली, हे सांगायची आता वेळ नाही. योग्य वेळी ते जनतेला नक्की कळेल. सध्या राज्याला संकटातून बाहेर काढायची वेळ आहे. त्यासाठी विरोधी पक्षाचे नेते नक्कीच हातभार लावतील, अशी अपेक्षा देखील त्यांनी व्यक्त केली.

थोडक्यात बातम्या-

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे केल्या ‘या’ मागण्या

‘महाराष्ट्राच्या नावावर काय खपवताय?’; राजेश टोपे संतापले

‘क्या आपका खून ऐसे राजा को देख खौलता नही?’; अमृता फडणवीसांची मुख्यमंत्र्यांवर टीका

महाराष्ट्रात कोरोनाचा उद्रेक, दिवसभरात तब्बल ‘इतक्या’ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद!

अखेर कोब्रा कमांडोला नक्षलवाद्यांनी सोडलं, पाहा काळजाचा थरकाप उडवणारा व्हिडीओ

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More