Loading...

“दबावशाही आणि झुंडशाही हे तर शिवसेनेचं वैशिष्ट्य”

मुंबई |  मुंबईची तुंबई झालेली असताना मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी त्यांना जाब विचारणाऱ्या महिलेचा हात पिरगळल्याची घटना घडली होती. मात्र, आता या महिलेवर दबाव आणून तिला माघार घेण्यास भाग पाडले आहे. ही दबावशाही, झुंडशाही हे शिवसेनेचं वैशिष्ट्य आहे, अशी जोरदार टीका राष्ट्रवादीच्या आमदार विद्या चव्हाण यांनी केली आहे.

महापौर विश्वनाथ महाडेश्वर सरांनी माझा हात पिरगळला नाही. त्यांनी माझा विनयभंग देखील केलेला नाही. त्यामुळे त्यांच्याविरोधात पोलिसांकडे तक्रार दाखल करण्याचा प्रश्नच येत नाही, असं त्या महिलेने म्हटलं आहे. त्यावर महिला राष्ट्रवादी चांगलीच भडकली आहे.

Loading...

मुंबईच्या महापौरांविरोधात राष्ट्रवादी महिला काँग्रेस चांगलीच आक्रमक झालेली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महापौरांची तात्काळ हकालपट्टी करावी, अशी मागणी राष्ट्रवादी महिला काँग्रेसने केली आहे.

दरम्यान, माझा विनयभंग झालाच नाही. व्हीडिओ व्हायरल झाल्याने महाडेश्वर सरांची आणि माझी विनाकारण बदनामी होत आहे, असं या घटनेतील संबंधित महिलेने सांगितलं आहे.

Loading...


महत्वाच्या बातम्या-

Loading...

-सैफ अली खानने स्मिता तांबेला दिली शाबासकी, म्हणाला…

-धनंजय मुंडे शेतकऱ्यांना फक्त 10 रूपयांत जेवण देणार…!

-काँग्रेसला 70 वर्षांत जमलं नाही… आम्ही 75 दिवसांत करून दाखवलं- अमित शहा

-“संपूर्ण देश स्वातंत्र्य दिन साजरा करत असताना आम्हाला प्राण्यांसारखं पिंजऱ्यात ठेवलंय”

-“महाराष्ट्रातूनच मराठी चित्रपटसृष्टीचं स्वातंत्र्य हिरावून घेतल्यासारखं वाटतंय”

Loading...