बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

विवाहबाह्य संबंध उघड झाल्यानं सुनेनं खोटे आरोप केले- विद्या चव्हाण

मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधान परिषदेतील आमदार विद्या चव्हाण यांच्याविरुद्ध सूनेचा छळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी चव्हाण यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली असून माझ्यावरील सर्व आरोप खोटे असल्याचं म्हटलं आहे.

माझ्या सुनेचे विवाहबाह्य संबंध आहेत. हे कळल्यानंतर माझ्या मुलानं घटस्फोट घेण्याची तयारी सुरू केली. तेव्हा सुनेनं छळाचे आरोप केले आहेत. मात्र, हे सर्व आरोप खोटे असून न्यायालयात सर्व सिद्ध होईल असं विद्या चव्हाण यांनी म्हटलं आहे.

माझ्या सुनेच्या मोबाइलवर काही आक्षेपार्ह मेसेज आढळले. तिचे विवाहबाह्य संबंध असल्याचं त्यातून समोर आलं. त्यामुळे माझ्या मुलाने वेगळं होण्याचा निर्णय घेतला. आपल्या सगळ्या गोष्टी उघड झाल्याचं पाहून तिनं वकीलाचा सल्ला घेऊन चुकीचा आरोप केला आहे, असंही त्या म्हणाल्या आहेत.

दरम्यान, पीडित सुनेच्या तक्रारीवरुन विद्या चव्हाण यांच्यासह त्यांचे पती अभिजीत, मुलगा अजित (पीडितेचा नवरा) दुसरा मुलगा आनंद (पीडितेचा दीर) आणि शीतल (आनंद यांची पत्नी) अशा एकूण पाच जणांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

ट्रेंडिंग बातम्या-

पंतप्रधान मोदींनी सोशल मीडिया सोडलं तर मीही सोडेन- अमृता फडणवीस

पंतप्रधान नरेंद्र मोदी सोशल मीडियाला सोडचिठ्ठी देणार?

महत्वाच्या बातम्या-

“सगळ्या मोदी भक्तांनी सोशल मीडिया सोडला तर देश शांत होईल”

“…म्हणून मोदींनी सोशल मीडिया बंद करायला ८ दिवसांचा वेळ घेतला असेल”

…जोपर्यंत मी आहे, तोपर्यंत मोदी आहेत- रामदास आठवले

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More