बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

राष्ट्रपती निवडणुकीत ‘त्या’ आमदारांमुळे राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा फटका!

नवी दिल्ली | देशाच्या नवीन राष्ट्रपतींच्या निवडीसाठी मतदान झाले. राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) म्हणजे भाजपने यासाठी दौपदी मुर्मू (Draupadi Murmu) यांना रिंगणात उतरवलं होतं. तर देशाच्या सर्व विरोधी पक्षांचे संयुक्त उमेदवार म्हणून यंशवंत सिन्हा (Yashwant Sinha) मैदानात होते. यावेळी दिल्लीत संसद भवनात तर प्रत्येक राज्यात विधानसभेत मतदान पार पडलं. यावेळी महारष्ट्रातील राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाचे मत फुटल्याची माहिती समोर येत आहे.

देशातील सर्व विरोधी पक्षांना भाजपवरुद्ध एकत्र आणण्याचा प्रयत्न शरद पवारांनी केला खरा, पण त्यांच्याच पक्षाच्या एकाने दौपदी मुर्मू यांना मत दिलं. यशवंत सिन्हा हे रिंगणात जरी असले, तरी दौपदी मुर्मू यांचा विजय सुखकर आहे. भाजपची 12 पेक्षा अधिक राज्यात एकहाती सत्ता आहे. त्यामुळे ते निश्चिंत आहेत. तर विरोधी पक्षांना आताच्या घडीला एक एक मत महत्वाचं आहे.

गुजरात राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार कंधाल जडेजा (Kandhal Jadega) यांनी भाजपच्या उमेदवांना मत दिले. जडेजा यांनी पत्रकारांशी बोलताना आपण मुर्मूंनाच मत दिल्याचे जाहीर केले. यावर गुजरातचे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पटेल (Jayant Patel) यांनी जडेजा यांच्याकजे स्पष्टीकरण मागितले आहे. कंधाल हे संपू्र्ण गुजरातमधील राष्ट्रवादीचे एकुलते एक आमदार आहेत. यावर आता पक्षाध्यक्ष काय कारवाई करणार हे पाहणे महत्वाचे ठरेल.

राष्ट्रपतींच्या निवडणूकीत महाराष्ट्रातील 283 आमदारांनी आपला हक्क बजावला. महाविकास आघाडीत तीन घटकपक्ष असून देखील तीघांनी एकाच उमेदवाराला पाठींबा दिला नाही. शिवसेनेेने खासदारांच्या विनंतीला मान देऊन मुर्मू यांना मत देण्याचा निर्णय घेतला. राष्ट्रवादीच्या आमदाराप्रमाणेच उत्तर प्रदेशातील समाजवादी पक्षाचे आमदार शिवपाल यादव आणि शहजिल इस्लाम, ओडीस्यातील काँग्रेसचे आमदार मोहम्मद मुकीम यांनी पक्षाचा व्हिप पायदळी तुडवला.

थोडक्यात बातम्या – 

राज्यातील ‘या’ भागात मुसळधार पावसाची शक्यता, हवामान विभागाकडून अलर्ट जारी

केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची मोठी घोषणा; महाराष्ट्रातील ‘हा’ रस्ता होणार राष्ट्रीय महामार्ग

अमित शहांचे सहकारी सल्ला घेण्यासाठी शरद पवारांच्या भेटीला; खुद्द पवारांनी दिली माहिती

उद्धव ठाकरेंना एकाच दिवशी सलग पाच धक्के!

सुष्मिताबाबत एक्स बाँयफ्रेंड विक्रम भट्ट यांचा मोठा खुलासा, म्हणाले…

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More