पुणे महाराष्ट्र

घरात, रुग्णालयात की फोटो फ्रेममध्ये, कुठे राहायचं हे तुमच्या हातात- अमोल कोल्हे

Loading...

पुणे | सध्या तुमच्याकडे तीन पर्याय आहेत, निमूटपणे प्रशासनाला सहकार्य करुन घरात राहणे, हिरोगिरी करुन बाहेर हिंडून स्वतःला आणि कुटुंबाला धोक्यात घालून हॉस्पिटलमध्ये राहणे किंवा भिंतीवरील फोटो फ्रेममध्ये, अशा हटके शब्दात राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी जनतेला आवाहन केलं आहे.

लॉकडाऊनमुळे शेतकरी बांधवांचं मोठं नुकसान होत असल्याचे अनेक फोन कालपासून आले. या संदर्भात “सोशल डिस्टन्सिंग” पाळून, कोरोनाचा प्रसार होणार नाही याची खबरदारी घेऊन काय उपाययोजना करता येईल याचा सकारात्मक विचार शासन आणि प्रशासनाने करण्याची आवश्यकता असल्याचं कोल्हे यांनी म्हटलं आहे.

Loading...

स्वयंशिस्तीची, प्रशासनाला साथ देण्याची गरज आहे. लॉकडाऊनची ना शासनाला सवय आहे, ना प्रशासनाला आणि ना नागरिकांना त्यामुळे एकमेकांना सांभाळून घेण्याची वेळ देण्याची गरज आहे. एक जबाबदार नागरिक म्हणून एवढं तरी करु शकतो, असं अमोल कोल्हे यांनी सांगितलं.

दरम्यान,सकारात्मक विचार शासन आणि प्रशासनाने करण्याची आवश्यकता आहे. पण त्याचवेळी नागरिक म्हणून आपणही आपली जबाबदारी समजून घेतली पाहिजे,’ असं मत कोल्हेंनी यांनी व्यक्त केलं आहे.

ट्रेंडिंग बातम्या-

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 11 वाजता शरद पवार फेसबुकवरुन साधणार जनतेशी संवाद

शिवसेना, राष्ट्रवादी आपल्या आमदार-खासदारांचे एक महिन्याचे वेतन सहाय्यता निधीला देणार

महत्वाच्या बातम्या-

ज्ञानदा काय तुमच्या घरात कामाला आहे काय रे… ट्रोलर्सचा चाकणकरांनी घेतला यथेच्छ समाचार

मशिदीत नमाजाला जाणाऱ्या मुस्लिम बांधवांना नवाब मलिकांची कळकळीची विनंती; म्हणतात

राष्ट्रवादीचे सर्व आमदार खासदार एक महिन्याचा पगार सहाय्यता निधीला देणार

Loading...

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या