देश

राष्ट्रवादीच्या वंदना चव्हाण राज्यसभेच्या उपसभापती होणार?

नवी दिल्ली | राष्ट्रवादीच्या वंदना चव्हाण राज्यसभेच्या उपसभापती होण्याची शक्यता आहे. विरोधकांकडून उपसभापतीपदासाठी राष्ट्रवादीचं नाव पुढं करण्यात आल्याचं कळतंय. 

तृणमूल काँग्रेसकडून सुकेंदू शेखर रॉय यांनी नकार दिल्यानंतर आता दिल्लीत वंदना चव्हाण यांच्या नावाबद्दल चर्चा आहे. विरोधकांना जिंकण्यासाठी टीआरएस आणि बीजेडी यांच्या मतांची आवश्यकता आहे. पवारांचा उमेदवार दिल्यास हे सोपं होईल, अशी काँग्रेसची धारणा आहे. 

दरम्यान, भाजप 69 जागांसह सभागृहात सर्वात मोठा पक्ष आहे. राज्यसभेच्या उपसभापतीपदासाठी 123 मतांची गरज आहे. त्यामुळे उपसभापतीपदाची निवडणूक रंगतदार होणार असल्याचं दिसतंय. 

महत्त्वाच्या बातम्या–

-दुग्धविकास मंत्र्यांना फोन केला म्हणून पोलिसांनी शेतकऱ्याला उचलून नेलं!

-बाळासाहेबांचं स्मारक एका क्षणात का होऊ शकत नाही?- निलेश राणे

-राजू शेट्टी प्रसिद्धीसाठी आंदोलन करत आहेत- रामदास आठवले

-मनसेनं कार्यालय फो़डलं पण शिवराय आणि गणपती बाप्पाचा मान राखला!

-संभाजी भिडेंच्या डोक्यावर परिणाम झाला आहे- रामदास आठवले

-त्या 16 धनगर मुलांसोबत काय झालं?; अजित पवार यांची धक्कादायक माहिती

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या