मुंबई | भाजपनं 2019 च्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सत्तेत आणण्यासाठी #कम अगेन मोदीजी हा ट्विटरवर ट्रेंड केला आहे. भाजपच्या या ट्रेंडला राष्ट्रवादी काँग्रेसनं प्रत्युत्तर दिलं आहे.
भाजपच्या ट्रेंडला उत्तर देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या ट्विटर अकांऊट वरून नरेंद्र मोदी पुन्हा सत्ते आले तर बेरोजगारीचा बकासूर वाढेल, असा संदेश देणार व्यंगचित्र शेअर करण्यात आलं आहे.
व्यंगचित्रामध्ये जनतेला चिरडणारा एक राक्षस दाखवण्यात आला आहे.
दरम्यान, नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले तर देशात महागाई, शेतकरी आत्महत्या आणि बेरोजगारी वाढेल, असं राष्ट्रवादी काँग्रेसनं म्हटलं आहे.
भाजप समर्थकांनी सध्या ट्विटरवर #ComeAgainModiji हा ट्रेंड सुरू केलाय. @narendramodi खरेच परत पंतप्रधान झाले, तर वाढती महागाई, बेरोजगारी, शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्या अशा सर्व समस्या आणि नकारात्मकताच खूश होईल, हे मात्र नक्की…@PMOIndia@BJP4India@BJP4Maharashtra #TeamModi pic.twitter.com/PamNrnPBIP
— NCP (@NCPspeaks) February 11, 2019
महत्वाच्या बातम्या-
-रोड शो मध्ये ‘चौकीदार चोर है’ च्या घोषणांनी लखनऊ दुमदुमलं!, पाहा व्हीडिओ
–“उत्तर प्रदेशात काँग्रेसची सत्ता आणल्याशिवाय शांत बसणार नाही”
–गडकरीजी, हनुमानाची जात सांगणाऱ्यांना कधी ठोकणार?; काँग्रेसचं गडकरींना आव्हान
–नरेंद्र मोदी पाकिस्तानचे पंतप्रधान असल्यासारखं वागतात- अरविंद केजरीवाल
–देशसेवेसाठी प्रियांकाला देशाच्या हवाली केलंय…. राॅबर्ट वाड्रांनी लिहिली भावुक पोस्ट