बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“माझं काय व्हायचं ते होऊ द्या, मी घाबरून घरात बसलो तर या लोकांनी कोणाच्या दारात बसायचं”

अहमदनगर | कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत चालला आहे. रूग्णालयांमध्ये आता दाखल करण्यासाठी त्यांच्याकडे जागा नाही. त्यात नव्याने कोरोना बाधितांची संख्या वाढतच चालली आहे. याच पार्श्वभूमीवर अनेक नेत्यांनी पुढाकार घेत कोविड सेंटरची उभारणी केली आहे. अशाच प्रकारे अहमदनगरला पारनेरचे आमदार निलेश लंके यांनी उभारलेल्या शरद पवार आरोग्य मंदिर कोविड सेंटर मुळे हजारो रुग्णांना दिलासा मिळाला आहे.

महत्त्वाचं म्हणजे आमदार लंके स्वतः रात्रंदिवस या कोविड सेंटर मधील रुग्णांची देखभाल करत आहेत. यावेळी त्यांनी, माझं काय व्हायचं ते होऊ द्या मात्र जर मी घाबरून घरात बसलो तर या लोकांनी कोणाच्या दारात बसायचं. त्यामुळे मी असुरक्षित असलो तरी चालेल पण माझी लोक सुरक्षित असली पाहिजेत, असं म्हटलं आहे.

लोकप्रतिनिधीचं खर काम काय असतं हे निलेश लंके यांनी दाखवून दिले आहे. लंके यांनी पारनेर तालुक्यातील भाळवणी येथे तब्बल 1 हजार 100 बेडच कोविड सेंटर उभारले आहेय. त्यात 1000 बेड आणि ऑक्सिजन युक्त 100 बेड आहेत.

दरम्यान, स्वतः रूग्णांचे ताप आणि ऑक्सिजनचे प्रमाण तपासतात. त्यासोबतच शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी वेगवेळी फळं दिली जातात. सकाळी अंडे आणि दूध, नाष्टा, भाजीपाला तर दुपारी आणि संध्याकाळी नॉनव्हेज तसेच शाकाहारी जेवण दिलं जातं.

थोडक्यात बातम्या- 

दिलदार ‘केकेआर’! पॅट कमिन्सनंतर केकेआरच्या आणखी एका खेळाडूने केली मदत

येत्या 48 तासात राज्यातील ‘या’ भागात मुसळधार पाऊसाची शक्यता, हवामानाचा खात्याचा शेतकऱ्यांना अलर्ट!

ज्युलिओ रिबेरोंच्या टिप्पणीवर फडणवीसांचं ओपन लेटर; म्हणाले, “माझ्या हातून….”

गर्भवती महिलेला स्ट्रेचर न मिळाल्याने धडपड करणाऱ्या डाॅक्टरांचा व्हिडीओ व्हायरल, पाहा व्हिडीओ

“तुम्ही कॅशियर म्हणून जॉईन व्हा, उपाध्यक्ष होऊ शकता अट एकच…”, नेटकऱ्याच्या ट्विटकर अमृता फडणवीस भडकल्या

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More