Top News पुणे राजकारण

सुप्रिया सुळेंनंतर पार्थ पवार आता अभिजीत पवारांच्या भेटीला

पुणे | राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी त्यांचे नातू पार्थ पवार यांना प्रसारमाध्यमांसमोर जाहीररित्या फटकारलं. यानंतर पवार कुटुंबात कलह सुरू झाल्याची चर्चा आहे. यानंतर पार्थ पवार कुटुंबातील सदस्यांच्या भेट घेत आहेत. त्यानुसार आता पार्थ पवार पुण्यात अभिजीत पवार यांच्या भेटीला गेले असल्याची माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पार्थ अभिजीत पवार यांच्या भेटीला गेले आहेत. यापुढे कोणता निर्णय घ्यायचा याबाबत पार्थ आता आपले काका आणि आत्या यांच्याशी चर्चा करणार आहेत. यासाठीच पार्थ पवार हे पुण्याला अभिजीत पवार यांच्या भेटीला गेले आहेत. तर अजित पवारही शनिवारी बारामतीत पवार कुटुंबाचं घर असलेल्या काटेवाडीत जाणार असल्याची माहिती आहे.

सुशांत सिंग आत्महत्या प्रकरणी पार्थ पवार यांनी सीबीआय चौकशीची मागणी केलेली होती. यावर प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पार्थ पवार अपरिपक्व असल्याचं म्हटलं होतं. “पार्थ हे अपरिपक्व आहेत. माझ्या नातवाच्या मागणीला कवडीची किंमत देत नाही. सुशांत सिंग प्रकरणात मुंबई पोलिसांनी केलेला तपास योग्यच आहे.” असं शरद पवार म्हणाले होते.

दरम्यान काल पार्थ पवार यांनी मुंबईतील सिल्वर ओक बंगाल्यावर जाऊन सुप्रिया सुळे यांची भेट घेतली. त्यानंतर सुप्रिया सुळे यांनी मंत्रालयात जाऊन अजित दादांना भेटल्या. कोणताही मोठा निर्णय घेण्यापूर्वी पार्थ पवार कुटुंबातील सदस्यांची भेट घेत असल्याच्या चर्चा सध्या रंगल्या आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-

महाविकास आघाडी सरकारला झटका; ग्रामपंचायत प्रशासकाबाबत हायकोर्टाचा मोठा निर्णय

‘महाराष्ट्र पोलीस’ आम्हाला तुमचा अभिमान आहे- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

पुण्यात घडलेल्या ‘या’ प्रकारानं पोलिसांची प्रतिमा मलीन; एका पोलिसाचं निलंबन

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या