मुंबई | राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटीव्ह आल्याच्या बातम्या पसरल्या होत्या. मात्र पार्थ पवार यांनी अजित पवार यांना कोरोनाची लागण झाली नसल्याचं स्पष्ट केलंय.
अजित पवार यांना गेल्या तीन-चार दिवसांपासून कणकण आणि ताप जाणवत होता. यामुळे पवारांनी सर्व दौरे रद्द करून मुंबईतील घरीच विश्रांती घेतलीये.
दरम्यान, अजित पवारांना कोरोनाची लागण झाल्याच्या बातमीने एकच खळबळ उडाली. मात्र, अजित पवारांचे पूत्र पार्थ पवार यांनी या वृत्ताचं खंडन केलंय. त्यांनी अजित पवार यांना कोरोनाची लागण झाली नसल्याचं एका वृत्तवाहिनीला सांगितलं आहे.
अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी आज मंत्रिमंडळाची बैठक घेण्यात येणार होती. मात्र अजित पवार यांची प्रकृती ठीक नसल्यामुळे राज्य मंत्रिमंडळाची बैठक रद्द करण्यात आलीये.
महत्वाच्या बातम्या-
…म्हणून सीबीआयला महाराष्ट्रात नो एंट्री- अनिल देशमुख
एकनाथ खडसेंच्या राजीनाम्यावर संजय राऊत म्हणाले…
“बिहारमधील प्रत्येक व्यक्तीला कोरोनाची लस मोफत देण्यात येईल”
अजित पवारांना कोरोनाची लक्षणं, क्वारंटाइन होण्याचा घेतला निर्णय!