NCP | राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात (NCP) उभी फूट पडल्याचं दिसून आलं. अवघ्या राज्याला हे पचनी पडलं नसल्याचं दिसलं आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आमदारांना सोबत घेत भाजपसोबत घरोबा केला. यामुळे पक्षात फूट पडल्याचं दिसून आलं आहे. अशातच आता राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते मनोहर नाईक यांच्या घरातच फूट पडली असल्याचं दिसून आलं. (NCP)
मनोहर नाईक यांचे पुत्र आता एकमेकांविरोधात पुसद विधानसभा मतदारसंघातून लढणार असल्याची चर्चा आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार (NCP) गटातून ययाती नाईक निवडणूक लढवतील, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र आपल्यासाठी अनेक पर्याय आपण उराशी बाळगून ठेवलेले आहेत, असं ययाती नाईक म्हणाल्यात.
ययाती नाईक नेमकं काय म्हणाले?
शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) हा पक्ष स्थापन होत असताना सुधाकरराव नाईक तिथे सोबत होते. तिथे आमचा परिवार हा शरद पवार यांच्यासोबत होता. आपण पाहिलं असेल अजित पवार यांनी एक गट काढला आणि भाजपसोबत ते सत्तेत गेले. त्यात इंद्रनिल देखील त्यांच्यासोबत गेले. ते मला न विचारता गेले. मला खंत आहे की, त्यांनी दोन मिनिटं बोलून विचारलं असतं आपण काय निर्णय घ्यायचा? तर आज असं घडलंच नसतं. याबाबत नाराजी असल्याचं ययाती नाईक यांनी म्हटलं.
मी गेली 20 वर्षांपासून पक्षात काम करत आहे. मला कोणीही 20 वर्षांमध्ये जबाबदारी दिली नाही. जर दिली असती तर मी व्यवस्थितरित्या पार पाडली असती, असं ययाती म्हणाले. त्यानंतर ते म्हणाले की, दुसरा विषय लोकसभा निवडणुकीत मोहिनी नाईक यांचं नाव समोर आलं. तेव्हा देखील कोणी माझं नाव काढलं नाही. कोणी तरी विचारलं असतं तर याचं देखील नाव आपण पुढे करायला हवं का?, तर मी सुद्ध त्यांना होकार दिला असता, असं ययाती नाईक म्हणाले.
“लीड मिळवायचं असेल तर…”
मागे कुठे कमी मतदान पडलं त्यासाठी मी पुन्हा एकदा पुसद तालुक्यात फिरणार आहे. पुन्हा एकदा अभ्यास करणार आहे. जर लीड मिळवायचं असेल तर आता वेगळी रणनीती आखणार असल्याचं ययाती नाईक म्हणाले आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्यानंतर आता मनोहर नाईक यांच्या घरात आपलीच मुलं आता एकमेंकांविरोधात आहेत. त्यामुळे आता मनोहन नाईक कोणत्या पुत्रास साथ देणार हे लवकरच समजेल.
News Title – NCP Party Senior leader Manohar Naik Two Sons Will Fight Face To Face In Pusad Marathi News
महत्त्वाच्या बातम्या
भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी वसीम अक्रमचं मोठं वक्तव्य, म्हणाला…
“थोडे दिवस धीर ठेवू, सर्वांना एकमेकांची गरज”; प्रफुल्ल पटेल यांचं मोठं वक्तव्य
“मस्ती आहे का?,ज्या दिवशी नरड्याला लागेल..”; मनोज जरांगेंचा नाव न घेता धनंजय मुंडेंना इशारा
गर्भवती महिलेला कारने दिली धडक, भयंकर अपघाताचं सीसीटीव्ही फुटेज समोर
राष्ट्रवादीला एकही मंत्रीपद नाही?; देवेंद्र फडणवीसांनी सांगितली अडचण