NCP Party Symbol भाजपसोबत गेल्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस यांनी पक्ष आणि चिन्हावर (NCP Party Symbol) दावा केला होता. याचा निकाल 6 फेब्रुवारी रोजी निवडणूक आयोगानं दिला आहे. हा निकाल धक्कादायक आहे. पक्ष आणि घड्याळ चिन्ह हे अजित पवारांकडे गेलं असल्यानं शरद पवारांना (Sharad Pawar) धक्का बसला आहे.
शिवसेना पक्षाप्रमाणे राष्ट्रवादी कँग्रेस पक्षात फूट पाहायला मिळाली होती. निवडणूक आयोगानं शिवसेनेबाबतीत जो निकाल दिला तोच निकाल राष्ट्रवादी पक्षाबाबत दिला आहे. ज्यावेळी अजित पवार यांनी पक्षावर आणि चिन्हावर दावा केला तेव्हाच शरद पवार यांना चिन्ह (NCP Party Symbol) गोठण्याची चिन्हे होती. यावर राज्यभरातील नेत्यांनी आपली प्रतिक्रिया दिली.
अजूनही शरद पवार यांना दुपारी 4 वाजेपर्यंत आपली बाजू मांडण्यासाठी वेळ आहे. मात्र यासाठी काहीसा वेळ बाकी आहे. शरद पवार गटानं जर याबाबत कोणताही निर्णय न घेतल्यास त्यांनी अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवावी लागेल, असं निवडणूक आयोग म्हणालं आहे. शिवसेना पक्षाचं ज्यावेळी पक्ष आणि चिन्ह काढून घेतलं गेलं त्यानंतर शरद पवारांच्या मनामध्ये पक्षाच्या चिन्हाबाबत प्रश्न येत होते. मात्र चिन्ह गेलं तरी काही हरकत नाही, असं शरद पवार यांनी आपल्या नेत्यांना सांगितलं होतं.
“चिन्ह गेलं तरी काही फरक पडत नाही”
जुलै महिन्यामध्ये शरद पवार यांनी शिवसेनेच्या निकालानंतर पक्षाच्या चिन्हाबाबत आणि पक्षाबाबत आपल्या खासदर आणि आमदारांसोबत वाय. बी. चव्हाण सेंटरला बैठक घेतली. त्यावेळी शरद पवार यांनी पक्ष आणि चिन्हावर भाष्य केलं. पक्ष आणि चिन्हं गेलं तरीही हरकत नाही. यावेळी बोलत असताना त्यांनी भूतकाळातील पक्षाच्या चिन्हांबाबत आठवणींना उजाळा दिला.
“अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली”
त्या सभेला संभोधित करत शरद पवार म्हणाले की, “घड्याळ चिन्ह कोणाला दिलं आहे ते सगळ्या देशाला माहिती आहे. अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली”, असं आवाहन करत कार्यकर्त्यांसोबत संवाद सांधला. यावेळी बोलत असताना त्यांनी आपल्या गतकाळातील पक्षाच्या चिन्हाबाबतही सांगितलं आहे.
शरद पवारांच्या राष्ट्रवादी कँग्रेस पक्षाची चिन्हे
“आतापर्यंत आयुष्यात अनेक निवडणूका लढवल्या आहेत. ज्यावेळी पहिली निवडणूक लढवली तेव्हा पक्षाचं चिन्ह हे बौलजोडी होती. त्यानंतर इंदिरा कँग्रेसवेळी आम्हाला गायवासरू चिन्ह मिळालं. त्यानंतर चरखा, हाताचा पंजा आणि नंतर घड्याळ हे चिन्ह मिळालं. चिन्ह आलं, गेलं पण जोपर्यंत सर्वसामान्य माणसांच्या मनामध्ये अंतकरणात पक्षाचा विचार जिवंत आहे, तोपर्यंत चिंता करायची गरज नाही, असं शरद पवार म्हणाले होते.
News Title – NCP Party Symbol Sharad Pawar
महत्त्वाच्या बातम्या
“हे आधीच पाहिलंय”, मास्टर ब्लास्टर आणि बीडचा ‘सचिन’, IPL फ्रँचायझीकडून खास कौतुक!
लग्नाचे आमिष दाखवले! महिला खेळाडूसोबत शरीरसंबंध; भारताच्या हॉकीपटूवर बलात्काराचा गुन्हा
ईशा देओल आणि भरत तख्तानी झाले विभक्त; लग्नाच्या 11 वर्षानंतर घटस्फोट, कारणही सांगितलं
Education | आंदोलन केल्यास नोकरी जाऊ शकते; नोकरदार शिक्षकांना सरकारचा गंभीर इशा