Top News

शरद पवारच ‘जाणता राजा’च; मुंबईत राष्ट्रवादीची पोस्टरबाजी

मुंबई | छत्रपती उदयनराजेंनी काल झालेल्या पत्रकार परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांवर निशाणा साधला होता. शरद पवारच ‘जाणता राजा’, अशा आशयाचे पोस्टरबाजी आज राष्ट्रवादीकडून घाटकोपरमध्ये करण्यात आली आहे.

शिवाजी महाराजांची तुलना कुणाशी होऊ शकत नाही. ‘जाणता राजा’ म्हणून अलिकडे उपमा दिल्या जातात. मात्र जाणता राजा फक्त शिवाजी महाराज आहे, असं उदयनराजे भोसले यांनी सांगितले होते.

शरद पवारांना राजकारणातले ‘जाणता राजा’ असं त्यांच्या कार्यकर्त्यांकडून म्हटलं जाते. त्यांचे अनेक कार्यकर्ते पोस्टरवरही जाणता राजा लिहितात.  या जगात जाणता राजा फक्त छत्रपती शिवराय होते. त्यांची तुलना कोणाशी होऊ शकत नाही, असं उदयनराजे भोसले पत्रकार परिषदेत म्हणाले आहेत.

दरम्यान, राष्ट्रवादी युवक काँग्रेसकडून पवारांचे पोस्टर झळकल्यामुळे उदयनराजे यावर काय प्रतिक्रिया देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

महत्वाच्या बातम्या-

 

 

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या