काँग्रेसला मोठा धक्का, हार्दिक पटेल राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार?

अहमदाबाद | गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसची चिंता वाढवणारी बातमी आहे. पाटीदार आरक्षणाचा नेता हार्दिक पटेल राष्ट्रवादीमध्ये जाण्याची शक्यता आहे. 

राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी हार्दिकची भेट घेतली. या भेटीत त्यांनी हार्दिकला राष्ट्रवादीत येण्याचं आमंत्रण दिल्याचं कळतंय. 

दरम्यान, ही भेट राजकीय नव्हती. दिवाळीनंतर गुजराती नागरिकांचं नवं वर्ष सुरु होतं. त्यानिमित्ताने शुभेच्छा देण्यासाठी आम्ही भेटलो होतो, असा दावा हार्दिकने केला आहे. 

दुसरीकडे आरक्षणाच्या मुद्द्यावरुन हार्दिकने काँग्रेसला अल्टिमेटम दिलं होतं. त्यापार्श्वभूमीवर प्रफुल्ल पटेलांची भेट चर्चेचा विषय ठरलीय.