राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदी पहिल्यांदाच महिला?; अजित पवारांचा पत्ता कट?
मुंबई | राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी राष्ट्रीय अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे पवार यांचा उत्तराधिकारी कोण? असा सवाल केला जात आहे. पवारांचा उत्तराधिकारी म्हणून अजित पवार (Ajit Pawar) आणि सुप्रिया सुळे यांचं नाव चर्चेत आहेत.
राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी अजित पवार यांची वर्णी लागण्याची शक्यता वर्तवली जात होती. पण ही शक्यता मावळली आहे. अजित पवार यांना पक्षाचं राष्ट्रीय अध्यक्षपद मिळणार नसल्याचं कळतंय.
अजितदादा यांचा फटकळ स्वभाव आणि त्यांच्या तडकाफडकी भूमिका यामुळे पक्षाला भविष्यात नुकसान होऊ शकतं असंही सांगितलं जात आहे. त्यामुळे अजित पवार यांच्या नावाला पक्षातून नापसंती असल्याची माहितीआहे.
सुप्रिया सुळे त्यांच्याकडे पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे जाण्याची शक्यता आहे. तसं झाल्यास राष्ट्रवादीला पहिल्यांदाच महिला अध्यक्ष मिळणार आहे.
महत्वाच्या बातम्या-
Comments are closed.