Top News महाराष्ट्र मुंबई राजकारण

सत्तेत आल्यापासून राष्ट्रवादीला लागली लाॅटरी, देणग्यांमध्ये इतक्या पटींची वाढ!

Photo Credit- Facebook/Sharad Pawar

मुंबई | महाविकास आघाडी सरकार सत्तास्थापनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मिळणाऱ्या देणगीमध्ये पाच पटीने वाढ झाली आहे. विशेष म्हणजे देणगीदारांमध्ये भाजप आमदाराच्या कंपनीचंही नाव असल्याने आणखी चर्चांना उधाण आले आहे. सर्वच राजकीय पक्षांना मिळणाऱ्या देणगीची रक्कम ही दोन लाखांच्या पुढे गेल्यास त्याची माहिती निवडणूक आयोगाला देणं बंधनकारक आहे.

2019-2020 या आर्थिक वर्षात मिळालेल्या देणगीची माहिती राष्ट्रवादीने जाहीर केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला 2019-2020 या वर्षात तब्बल 59.94 कोटी रूपये देणगी मिळाल्याचं स्पष्ट झालं आहे. मागच्या वर्षी हीच रक्कम 12.05 कोटी रूपये एवढी होती.

एवढ्या मोठ्या प्रमाणात देणगीमध्ये वाढ झाल्याने राष्ट्रवादीला लाॅटरी लागल्याचं चित्र दिसत आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे भारतीय जनता पक्ष मुंबईचे प्रमुख आणि आमदार मंगल प्रभात लोढा यांच्या मालकीच्या लोढा डेव्हलपर्स या कंपनीने 5 कोटी रूपयांची देणगी राष्ट्रवादीला दिली आहे. त्यामुळे, गतवर्षीपेक्षा यावर्षी मिळालेल्या देणगीत पाच पटीने वाढ झाल्याचं दिसून येत आहे.

या सर्व प्रकाराबद्दल मंगल प्रभात लोढा यांना विचारणा केली असता कंपनी माझ्या मालकीची आहे पण मी प्रत्यक्षरित्या ती सांभाळत नसून कंपनीच्या कार्यालयात याबाबत विचारण्याचं सांगण्यात आलं आहे. या गोष्टीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

थोडक्यात बातम्या-

आतुरता संपली; नवीन टाटा सफारी लाँच, किंमतही ठरली

कोरोना नियमांचं उल्लंघन, भाजप नेत्यासह तिघांवर गुन्हा दाखल

पुण्यातील ‘या’ आमदाराला कोरोनाची लागण, अजित पवारांच्या बैठकीला होते उपस्थित!

‘…तर मला आज नातवंडे असती’; भाईजानने व्यक्त केल खंत!

शिवरायांच्या कन्येवरून भाजप-शिवसेनेत ‘ट्विट वॉर’

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या