Loading...

शेतकऱ्यांच्या ‘या’ मागण्यांसाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

मुंबई | शेतकऱ्यांना एकरी 25 हजार रूपये अनुदान देण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसने मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. यासंदर्भात निवेदन देण्यासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली.

राज्य सरकारच्या विवध योजनांचा राज्यात बोजवारा उडाल्याचे सांगत राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाल्याचं दिसत आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, विधीमंडळ पक्षनेते अजित पवार, जितेंद्र  आव्हाड, धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्र्याना समक्ष भेटून निवेदन दिलं आहे.

Loading...

शेतकऱ्यांना वार्षिक 6 हजार रूपये देण्याची घोषणा करण्यात आली होती. दुसरा हप्ता देण्याची वेळ आली तरी पहिला हप्ता अद्यापही शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेला नाही, असा आरोपही राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केला आहे.

सार्वजनीक वितरण व्यवस्थेतील स्वस्त धान्य देण्यात येणाऱ्या लाभांपासून 50 लाखांपेक्षा जास्त कुटुंब वंचित आहेत. याला पूर्णपणे केंद्रातील आणि राज्यातील सरकार जबाबदार आहे, असा आरोप निवेदनामध्ये केला गेला आहे.

Loading...

महत्वाच्या बातम्या-

मंत्री, आमदारांप्रमाणे सरपंच देखील पद आणि गोपनियतेची शपथ घेणार

Loading...

-रवी शास्त्रींचं पद जाणार? बीसीसीआयनं मुख्य प्रशिक्षकपदासाठी मागवले अर्ज

-चांगल्या सेवा हव्या असतील तर टोल भरावाच लागेल- नितीन गडकरी

-“माझ्या मंत्रीपदाबाबत पक्ष जो निर्णय घेईल तो मला मान्य असेल”

-दुर्घटनांचं सत्र थांबेना; पुण्यात 90 वर्षांपुर्वीचा जुना वाडा कोसळला

Loading...