बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“आम्ही उपाशी आहेत की नाही हे जनता ठरवेल मात्र तुम्ही नेहमी कुपोषित दिसता”

मुंबई |  भाजप सत्तेत असताना मागची वर्षे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार उपाशी असल्यासारखे बसले होते, अशी बोचरी टीका भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली होती. त्यांच्या याच टीकेला राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

आम्ही उपाशी आहोत की नाही हे जनता ठरवेल मात्र चंद्रकांत पाटील तुम्ही नेहमी कुपोषित असल्यासारखे दिसता, अशा शब्दात त्यांनी  पाटील यांनी केलेल्या टीकेला उत्तर दिलं आहे. ट्वीट करून त्यांनी पाटील यांना लक्ष्य केलं आहे.

आमच्या पक्षाचा जन्मच सत्तेत झाला आहे. आम्ही उपाशी आहोत की नाही हे जनता ठरवेल. तुम्ही मात्र नेहमीच कुपोषित दिसतायत. सूर्याच्या तेजामुळे वैफल्यग्रस्त झालेली माणसे मग सूर्यावर थुंकायला लागतात. लक्षात ठेवा अजून जवळ याल तर कधी कोळसा होईल सांगता येणार नाही, असं प्रत्युत्तर त्यांनी दिलं आहे.

दरम्यान, चंद्रकांत पाटील यांनी एका मुलाखतीत बोलताना राष्ट्रवादीवर चांगलंच तोंडसुख घेतलं होतं. अजित पवार यांच्यावर निशाणा साधताना त्यांच्यावर पी. एचडी करण्याची इच्छा बोलून दाखवली तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अ‌ॅक्सिडेंटल मुख्यमंत्री आहेत त्यांनी तात्काळ राजीनामा द्यायला पाहिजे, अशी मागणी केली.

 

ट्रेंडिंग बातम्या-

जयंती मल्हारराव होळकरांची, फोटो वापरला तुकोजीरावांचा; राम शिंदेंकडून मोठी चूक

“…तस आदित्य ठाकरेंना खुश करण्यामध्ये अजित पवारांसह सर्वांचं भलं”

महत्वाच्या बातम्या-

“भाजपने स्वतःच्या पायावर स्वतः धोंडा मारून घेतला म्हणून उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले”

कोरोना म्हणजे अल्लाहने दिलेली शिक्षा म्हणणाऱ्या मुस्लिम धर्मगुरूलाच कोरोनाची लागण!

शरद पवारांनंतर आता अजित पवारांवर देखील पीएचडी करण्याची इच्छा- चंद्रकांत पाटील

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More