औरंगाबाद महाराष्ट्र

शेतकऱ्याच्या लेकीचा मदतीचा हात; गोरगरिबांना देणार स्वत:च्या शेतातली ज्वारी तसंच गरजेच्या वस्तू

उस्मानाबाद | कोरोनाचं भयान संकट सध्या महाराष्ट्रावर आहे. सगळेच अडचणीत सापडले आहेत. मात्र या अडचणीच्या काळात माणुसकीचं दर्शन होत आहे. समाजातले अनेक दानशूर लोक मदतीसाठी पुढे येऊ लागले आहेत. युवती राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा तसंच उस्मानाबाद जि.प. सदस्या सक्षणा सलगर यांनीही गोरगरिबांना मदतीचा हात दिला आहे.

स्वत:च्या शेतातील ज्वारी त्यांनी गोरगरिबांना देण्याचं ठरवलं आहे. तसंच डाळी, साखर आणि अन्य गरजेच्या वस्तू त्या गरजू लोकांना देणार आहे. प्राधान्याने ज्यांच्याकडे रेशनकार्ड नाहीये. ज्यांचे अतिशय हालाखीत दिवस चालले आहेत. अशा गरजू लोकांना त्यांनी मदत देण्याचं ठरवलं आहे. उस्मानाबाद जिल्ह्यात कामानिमित्त परराज्यातून आलेल्या कामगार वर्गाला देखील त्या मदत करणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.

नुसतीच भाषणं करून काही होणार नाही तर मदतीसाठी देखील पुढे आलं पाहिजे. ‘एकमेका सहाय्य करू, अवघे धरू सुपंत’ ही शिकवण आपल्याला आहे. तसंच माणुसकीची उपासना करण्याचा उपदेश आपल्याला अनेक संतांनी दिला आहे. तीच शिकवण सत्यात उतरवण्याची हीच खरी वेळ आहे, अशा भावना यावेळी त्यांनी व्यक्त केल्या.

दरम्यान, कोरोनाच्या लढ्यात आपल्या सगळ्यांचा सहभाग हवा आहे. आपण कोणताही धोका न पत्करता घरीच थांबून प्रशासनाला सहकार्य करा. ही पहिली लढाई आहे जी आपल्याला घरी राहून जिंकायची आहे. लवकरच आपण यावर मात करू, असं त्या म्हणाल्या.

ट्रेंडिंग बातम्या-

देशात 4 हजारांवर कोरोनाचे रुग्ण तर 109 मृत्यू, 25 हजार तबलिगी क्वारंटाईन

‘आम्हाला पैशांची समस्या नाही तर…’, केजरीवालांनी दिलं गौतम गंभीरला उत्तर

महत्वाच्या बातम्या-

माजी पंतप्रधान मोहम्मद जिब्राईल यांचा कोरोनामुळे झाला मृत्यू

… तर गंभीर परिणाम भोगावे लागतील; डोनाल्ड ट्रम्प यांची भारताला धमकी

14 एप्रिलला लॉकडाऊन संपणार का?; आरोग्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या