बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

राष्ट्रवादी युवक व्यंकय्या नायडूंना ‘जय भवानी, जय शिवाजी’ घोषणा लिहिलेली 20 लाख पत्रं पाठवणार!

मुंबई |  राज्यसभा खासदारकीची शपथ घेतल्यानंतर शपथेचा समारोप करताना भाजप खासदार उदयनराजे भोसले यांनी जय भवानी जय शिवाजी अशी घोषणा देऊन केला. ही बाब उपराष्ट्रपती तथा राज्यसभा सभापती व्यंकय्या नायडू यांना खटकली आणि त्यांनी तात्काळ उदयनराजेंना समज दिली. या प्रकारानंतर राष्ट्रवादी युवक काँग्रेस आक्रमक झाली आहे.

‘जय भवानी, जय शिवाजी’ घोषणा लिहिलेली 20 लाख पत्रं राष्ट्रवादी युवक काँग्रेस उपराष्ट्रपती तथा राज्यसभा सभापती व्यंकय्या नायडू यांना पाठवणार आहे. भाजपच्या मनात महाराष्ट्राबद्दस किती आकस आहे हे यावरून सिद्ध होत असल्याचं राष्ट्रवादी युवकचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख म्हणाले.

मेहबूब शेख म्हणाले, “राज्यसभा खासदारांच्या शपथविधीच्या वेळी, भाजपच्याच एका खासदाराने ‘जय भवानी जय शिवाजी’ घोषणा दिली. परंतु त्यावरी राज्यसभेचे सभापती उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी त्यांना रोखलं. यावरुनच भाजपच्या मनात छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल काय भावना दिसून आली.”

“महाराष्ट्राबद्दल भाजपच्या मनात किती द्वेष भरलेला आहे हे दिसतं. याचाच निषेध म्हणून राष्ट्रवादी युवक काँग्रेस ‘जय भवानी जय शिवाजी’ घोषणा लिहिलेलं पोस्टकार्ड व्यंकय्या नायडू यांना पाठवणार आहे. भाजपने महाराष्ट्राचा द्वेष थांबवावा अन्यथा महाराष्ट्र त्यांना कधीच माफ करणार नाही.”

 

 

दुसरीकडे शरद पवार यांनी राम मंदिराबाबत केलेल्या वक्तव्याचा निषेध म्हणून त्यांच्या मुंबईतील घरच्या पत्त्यावर ‘जय श्रीराम’ लिहिलेली 10 लाख पोस्टकार्ड भाजयुमो पाठवणार आहेत. त्यालाच उत्तर म्हणून राष्ट्रवादीकडून 20 लाख पत्रे पाठवली जाणार असल्याची माहिती यांनी दिली.

महत्त्वाच्या बातम्या-

लक्षणं नसलेल्या रूग्णांकरिता कोल्हापूर महापालिकेने घेतला मोठा निर्णय

“शिवछत्रपतींचा आशीर्वाद, आदर्श व त्यांच्या विचारांचा वारसा घेऊन जनतेची सेवा करतोय…”

“भाजपचं शिवाजी महाराजांबद्दलचं प्रेम बेगडी, केवळ निवडणुकीपुरते शिवाजी महाराज हवेत”

खा. इम्तियाज जलीलांची ईदसाठी मशीद उघडण्याची मागणी, पालिका आयुक्तांचा साफ नकार

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More