मोठी बातमी! शरद पवार गटाकडून उमेदवारांची पहिली यादी जाहीर

Sharad Pawar

NCP Sharad Pawar Candidate | बहुप्रतिक्षित राष्ट्रवादी काँग्रेस शरचंद्र पवार पक्षाची उमेदवार यादी जाहीर झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी विधानसभा निवडणुकीसाठीच्या उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. जयंत पाटील यांनी पहिल्या यादीत शरद पवार गटाच्या एकूण 44 उमेदवारांची नावे जाहीर केली. यामध्ये बारामती मतदारसंघाचा देखील समावेश आहे.

बारामतीमधून शरद पवार गटाकडून युगेंद्र पवार यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे बारामतीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विरुद्ध पुतणे युगेंद्र पवार यांच्यात आता थेट लढत बघायला मिळणार आहे.

इस्लामपूरमधून जयंत पाटील रिंगणात असतीलय काटोल मतदारसंघातून अनिल देशमुख रिंगणात असणार आहेत. घनसावंगीमधून राजेश टोपे रिंगणात असतील. कराड उत्तरमधून बाळासाहेब पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

मुंब्रा कळवा मतदारसंघातून विरोधी पक्षनेते जितेंद्र आव्हाड यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. बारामतीमधून युगेंद्र पवार यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

जयंत पाटील – इस्लामपूर
अनिल देशमुख- काटोल
राजेश टोपे- घनसावंगी
बाळासाहेब पाटील- कराड उत्तर
जितेंद्र आव्हाड- कळबा मुंब्रा
शशिकांत शिंदे – कोरेगाव
जयप्रकाश दांडेगावकर- वसमत
गुलाबराव देवकर- जळगाव ग्रामीण
हर्षवर्धन पाटील- इंदापूर
प्राजक्त तनपुरे -राहुरी
अशोकराव पवार- शिरुर
मानसिंगराव नाईक- शिराळा
सुनील भुसारा- विक्रमगड
रोहित पवार- कर्जत जामखेड
विनायकराव पाटील- अहमदपूर
राजेंद्र शिंगणे- सिंदखेडराजा
सुधाकर भालेराव- उदगीर
चंद्रकांत दानवे- भोकरदन
चरण वाघमारे- तुमसर
प्रदीप नाईक- किनवट
विजय भांबळे-जिंतूर
पृथ्वीराज साठे- केज
संदीप नाईक- बेलापूर
बापूसाहेब पठारे- वडगाव शेरी
दिलीप खोडपे- जामनेर
रोहिणी खडसे- मुक्ताईनगर
सम्राट डोंगरदिवे-मुर्तिजापूर
रविकांत बोपछे- तिरोडा
भाग्यश्री अत्राम- अहेरी
बबलू चौधरी- बदनापूर
सुभाष पवार- मुरबाड
राखी जाधव- घाटकोपर पूर्व
देवदत्त निकम- आंबेगाव
युगेंद्र पवार – बारामती
संदीप वर्पे- कोपरगाव
प्रताप ढाकणे- शेवगाव
राणी लंके- पारनेर
मेहबूब शेख- आष्टी
करमाळा-नारायण पाटील
महेश कोठे-सोलापूर शहर उत्तर
प्रशांत यादव- चिपळूण
समरजीत घाटगे – कागल
रोहित आर आर पाटील- तासगाव कवठेमहाकाळ
प्रशांत जगताप -हडपसर

महत्त्वाच्या बातम्या- 

ठाकरेंनी बड्या नेत्याची उमेदवारी नाकारली!

धक्कादायक! 85 विमानं बॉम्बने उडवण्याची धमकी; काय आहे प्रकरण

आज ‘या’ दिग्गज नेत्यांनी भरले उमेदवारी अर्ज

बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणातील मोठी अपडेट्स समोर

निवडणुकीतच गेम करणार.., मनोज जरांगेंना जीवे मारण्याची धमकी; राजकारणात खळबळ

Join WhatsApp

Join Now

संबंधित बातम्या

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .