मोठी बातमी! राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्याचा अपघातात मृत्यू

ncp sharad pawar group state secretary shrihari kale dies in accident at majalgaon

Shrihari Kale | राज्यासह देशभरात रस्ते अपघातांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. या अपघातांमध्ये रोज शेकडो नागरिकांना आपला जीव गमवावा लागत आहे. आता बीड जिल्ह्यातील माजलगावजवळ एक भीषण अपघात घडला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाचे प्रदेश सचिव श्रीहरी काळे (Shrihari Kale) यांना माजलगाव शहरातील राष्ट्रीय महामार्गावर उभे असताना एका भरधाव वाहनाने धडक दिली, या अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला.

लग्न समारंभाहून परतताना काळाचा घाला

मिळालेल्या माहितीनुसार, श्रीहरी काळे आपल्या काही मित्रांसह एका लग्न समारंभासाठी गेले होते. लग्न समारंभ आटोपून परतत असताना ते माजलगावजवळ राष्ट्रीय महामार्गावर थांबले होते. यावेळी एका भरधाव वाहनाने त्यांना जोराची धडक दिली. या धडकेत ते गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

असा घडला अपघात

श्रीहरी काळे (Shrihari Kale) हे माजी जिल्हा परिषद सदस्य डॉ. भगवान सरवदे यांच्यासोबत लग्न समारंभासाठी परभणीला गेले होते. सायंकाळी लग्न समारंभ उरकून श्रीहरी काळे परतत असताना ते माजलगाव शहरापासून १० किमी अंतरावर असलेल्या खरात आडगाव फाटा येथे रात्री ८ वाजण्याच्या सुमारास चहापाणी घेण्यासाठी थांबले. त्याचवेळी त्यांना एका अज्ञात वाहनाने धडक दिली. पोलिसांनी अज्ञात वाहनचालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

श्रीहरी काळे हे गेल्या अनेक वर्षांपासून शरद पवार गटाशी एकनिष्ठ होते. ते एक उत्तम वक्ते म्हणून परिचित होते. मागील माजलगाव विधानसभा निवडणुकीत त्यांनी शरद पवार गटासाठी जोरदार प्रचार केला होता. त्यांच्या अपघाती निधनाने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. काळे यांच्या अपघाती निधनाने त्यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

दोन दिवसांपूर्वीच बीडच्या केज तालुक्यातील अहमदपूर-अहमदनगर महामार्गावरील चंदन सावरगावजवळ भीषण अपघात झाला होता. त्यात ३ जणांचा मृत्यू झाला होता, तर एक जण गंभीर जखमी झाला होता. या अपघातात अमित दिलीपराव कोमटवार यांचा मृत्यू झाला होता, अमित हे दिंद्रुडचे सरपंच अजय कोमटवार यांचे ज्येष्ठ बंधू होते.

Title : ncp sharad pawar group state secretary shrihari kale dies in accident at majalgaon

 

Join WhatsApp

Join Now

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .