Top News राजकारण

शरद पवार हे 4 खासदारांचे लोकनेते; गोपीचंद पडळकर यांनी टीका

सांगली | राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी टीका केल्यानंतर मोठा वादंग माजलाय. त्यातच आता भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर पुन्हा एकदा शरद पवारांवर निशाणा साधला आहे.

गोपीचंद पडळकर यांनी, शरद पवार हे चार खासदारांचे लोकनेते असल्याची अशी टीका केली आहे.

गोपीचंद पडळकर म्हणाले, “भाजपच्या केंद्रातील नेतृत्वावर नेहमी टीका केली जाते. शरद पवारांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काम करतेय. चार खासदारांच्या नेत्यांना लोकनेता म्हणतात मग 303 खासदारांच्या नरेंद्र मोदींना तुम्ही काय म्हणणार?”

यापूर्वीही आमदार पडळकर यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली होती. शरद पवार हे राज्याला लागलेला कोरोना आहे, असं विधान पडळकर यांनी केलं होतं.

महत्वाच्या बातम्या-

एनसीबी अधिकारी समीर वानखेडे आणि पथकावर ड्रग्ज पेडलर्सचा हल्ला

प्रेस नाव असलेली गाडी पुणे पोलिसांनी अडवली अन् समोर आली धक्कादायक माहिती!

शरद पवारांना छोटे नेते म्हणणाऱ्या चंद्रकांत पाटलांना संजय राऊतांचं प्रत्युत्तर; म्हणाले…

आता पहाटे नाही तर योग्य वेळीच शपथ दिसेल- देवेंद्र फडणवीस

“चंद्रकांत पाटील यांच्या डोक्यावर परिणाम, सत्ता गेल्याने त्यांची अवस्था मनोरुग्णासारखी झालीये”

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या