Top News महाराष्ट्र मुंबई

सुप्रीम कोर्टातील मराठा आरक्षण सुनावणीवर शरद पवार म्हणाले…

मुंबई | मराठा आरक्षणाच्या स्थगितीनंतर पहिली सुनावणी न्यायालयाने चार आठवड्यांसाठी लांबणीवर टाकली आहे. मात्र सुनावणीदरम्यान राज्य सरकारचे वकील अनुपस्थित राहण्यावरुन आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. यावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

नेमका काय गोंधळ उडाला याची मला माहिती नाही. माझ्या माहितीप्रमाणे कोर्टात खूपदा मोठ्या वकिलांच्या वेळा अॅडजस्ट केल्या जातात. वकील सुरुवातीला नव्हते पण त्यानंतर अर्ध्या तासाने ते आले. युक्तिवाद झाला चर्चा झाली असल्याचं शरद पवार म्हणाले.

त्यानंतर न्यायाधीशांनीही विषय घेऊन त्यावर निर्णय घेतला. त्यामुळे त्यावर टिप्पणी करण्याची गरज नसल्याचं शरद पवार यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, शरद पवारांनी मराठा आरक्षणाबाबत आपली भूमिका मांडायला हवी. जेणेकरून मराठा समाजाला आंदोलनाची पुढची दिशा निश्चित करता येणार असल्याचं  मराठा आरक्षण संघर्ष समितीचे नेते सुरेश पाटील यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

“शरद पवारांनी मराठा आरक्षणाविषयीची आपली भूमिका मांडावी, मग आम्ही…”

“पप्पाच्या पप्पूने मुलीला त्रास देण्यासाठी जनतेचे 82 लाख उडवले”

आम्ही या गोष्टीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची बरोबरी करू शकत नाही- राहुल गांधी

…तर लोक मोदींना हाकलून लावतील- राहुल गांधी

शिवसेनेचा भगवा फडकवा, हे 30 वर्षांपासून ऐकतोय- शरद पवार

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या