Top News महाराष्ट्र मुंबई राजकारण

….तर महाराष्ट्रात कोणतंही ऑपरेशन फोल ठरेल, शरद पवारांचं भाजपला ओपन चॅलेंज

मुंबई |  मध्य प्रदेश आणि सध्या राजस्थानमध्ये सुरू असलेल्या ऑपरेशन लोटसबाबत महाराष्ट्रात देखील चर्चा सुरू झाली आहे. तेव्हा महाराष्ट्रात असं काही होऊ शकेल काय?, असा थेट प्रश्न शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी शरद पवार यांना विचारला. त्यावर मुख्यमंत्र्यांनी फक्त तीन पक्षातल्या नेत्यांशी उत्तम डॉयलॉग ठेवावा, महाराष्ट्रात कोणतंच ऑपरेशन यशस्वी होणार नाही, असं पवार यांनी ठणाकावून सांगितलं आहे.

विविध राज्यातली विरोधी पक्षाची सरकारं पाडण्याचा केंद्रिय नेतृत्वाने चंगच बांधला आहे. तशी महाराष्ट्रात देखील चर्चा सुरू असल्याचं राऊत यांनी म्हटलं. त्यावर बोलता,ना माझ्याही कानावर अनेकदा अश्या चर्चा येत असतात. परंतू ठाकरे सरकारला पाच वर्षे कसलाही धोका नाही. सरकार पाच वर्ष उत्तम काम करेल, असा दावा पवार यांनी केला.

ऑपरेशन लोटसवर बोलताना शरद पवार यांनी भाजपवर तुफान हल्लाबोल केला. पवार म्हणाले, “ऑपरेशन लोटस याचा सरळसरळ अर्थ की सत्तेचा गैरवापर करून लोकांनी निर्माण केलेली सरकारं दुबळी करणं, लोकांच्या मतांची सरकारं उद्धवस्त करणं, आणि त्यासाठी केंद्रिय सत्तेचा पुरेपूर वापरं करणं”

“हे सरकार पाच वर्ष उत्तम पद्धतीने राज्याचा गाडा हाकेल असा विश्वास व्यक्त करत पुढील निवडणुकीला देखील हे तिन्ही पक्ष एकत्रितपणे सामोरे जातील,” असंही पवार यांनी म्हटलं.

शरद पवारांच्या ‘या’ दाव्याने राजकारणात खळबळ, भाजपला हादरा!

महिला पोलिसासोबत गैरवर्तन; मंत्र्याच्या मुलासह 2 जणांना अटक

कोरोनानंतरचा पहिलाच क्रिकेट सामना; ‘या’ संघानं मिळवला थरारक विजय

दडी मारलेला पाऊस करणार दैना; पुढील 4 दिवस ‘या’ भागांमध्ये जोरदार पावसाची शक्यता

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या