Top News महाराष्ट्र मुंबई

‘हिंमत असेल तर एकएकटे लढा’; सत्ताधाऱ्यांना आव्हान देणाऱ्या पाटलांच्या वक्तव्यावर पवार म्हणाले…

मुंबई | पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीने पुणे, नागपूर आणि औरंगाबादमध्ये बाजी मारली आहे. यामध्ये भाजपचा बालेकिल्ला असलेल्या पुणे आणि नागपूर पदवीधर मतदारसंघात झालेल्या पराभवाने भाजपसाठी मोठा धक्का मानला जात आहे.

20 वर्षे भाजपकडे पुणे पदवीधर मतदारसंघ होता. मात्र भाजपला तो गमवावा लागला आहे. राष्ट्रवादीचे अरूण लाड यांनी तिथे विजय मिळवला आहे. यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया देताना हिंमत असेल तर एकएकटे लढा, असं म्हणत सत्ताधाऱ्यांना आव्हान दिलं होतं. यावर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी बोलताना पाटलांवर निशाणा साधला आहे.

भाजप प्रदेशाध्यक्षांचा विनोदी वक्तव्य करण्याचा लौकिक आहे. मागच्या वेळेस विधान परिषदेला चंद्रकांतदादा कसे निवडून आले ते सर्वांना माहित आहे. तसेच पुणे शहरातील त्यांच्या सोयीचा मतदारसंघ त्यांनी निवडला, असल्याचं पवार म्हणाले.

दरम्यान, भाजपने मिळवलेला धुळे-नंदुरबारचा विजय आश्चर्यकारक नव्हता. त्यांच्या हाती मोठा वर्ग पूर्वीपासून होता. त्याचा विजय नव्हे, तो खरा विजय नाही. नागरपूची जागा कधीच मिळाली नव्हती. ती कॉग्रेसने जिंकली. महाराष्ट्रातील हा निकाल महाविकासआघाडीचा विजय असल्याचंही शरद पवार यांनी सांगितलं.

महत्वाच्या बातम्या-

‘चंद्रकांतदादांमुळे माझा विजय सोपा’; विजयी उमेदवार अरूण लाड यांचा टोला

आता सर्वसामान्य लोकांनीही महाविकासआघाडी सरकारला स्वीकारलं आहे- शरद पवार

‘आत्महत्या करणारे शेतकरी भेकड’; कर्नाटकच्या कृषीमंत्र्यांचं संतापजनक वक्तव्य

“…हे मुख्यमंत्र्यांचं कौतुक की अब्रू काढणं हे अजित पवार सांगू शकतात”

‘हिंमत असेल तर एकएकटे लढा’; पाटलांचं सत्ताधाऱ्यांना आव्हान

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या