शरद पवारांना धक्का; दिल्लीतील बड्या नेत्याने सोडली साथ?

NCP | राज्यात लोकसभा निवडणूक नुकतीच पार पडली आहे. आता विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. अशातच आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे दिल्ली येथे सक्रिय असलेले नेते धीरज शर्मा हे एका पोस्टमुळे चर्चेत आले आहेत. धीरज शर्मा यांनी एक फेसबुक पोस्ट केली त्यात त्यांनी शरद पवार यांना सोडण्याबाबत नमूद केलं आहे. (NCP)

राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) शरदचंद्र पवार गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष नेते धीरज शर्मा यांनी एक फेसबुक पोस्ट केली. त्यामुळे ते आता शरद पवार यांना सोडणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. त्यांनी फेसबुक पोस्टमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पदाचा राजीनामा देणार असल्याचं बोललं आहे. धीरज शर्मा यांनी जरीही पक्षाचा राजीनामा दिला असला तरीही प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला नसल्याची माहिती सूत्रांद्वारे समोर आली. (NCP)

धीरज शर्मा यांची फेसबुक पोस्ट

मी धीरज शर्मा, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने दिलेल्या सर्व पदांमधून स्वत:ला मुक्त करतो आहे, असं फेसबुक पोस्टमध्ये नमूद करण्यात आलं आहे. ही पोस्ट लिहित असताना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या फेसबुकला आणि शरद पवार यांना त्यांनी मेन्शन केलं आहे. (NCP)

धीरज शर्मा कोण?

धीरज शर्मा हे राष्ट्रवादीचे युवा चेहरा आहेत. धीरज शर्मा दिल्लीत राहतात. दिल्लीतील तरूण वर्गाशी त्यांचा सुसंगत संवाद आहे. युवक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते अध्यक्ष राहिले आहेत. 2019 ला महाविकास आघाडी होती.

दरम्यान अद्यापही धीरज शर्मा हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातून बाहेर पडले नाहीत. ते अजूनही शरद पवार यांच्यासोबतच आहेत. फक्त त्यांनी पक्षाच्या राष्ट्रीय पदाचा राजीनामा दिला. यामुळे ते आता पक्ष सोडणार असल्याच्या तर्क वितर्कांना आता उधाण आलं आहे.

मात्र येणाऱ्या काही वेळेत याबाबत जर धीरज शर्मा यांनी जर मोठा निर्णय घेतला तर कदाचित ते पक्षातून बाहेर पडण्याची शक्यता नाकारता येणार नाही. कदाचित असं घडल्यास पक्षाचा युवा चेहरा नेमका कोण असेल? यावर आता प्रश्नचिन्ह आहे.

News Title – NCP Sharadchandra Pawar Party Leader Dhiraj Sharma Leave Party About Facebook Post

महत्त्वाच्या बातम्या

“कुणीतरी लवकरच रस्त्यावर..”; घटस्फोटाच्या चर्चेदरम्यानच हार्दिकच्या बायकोची खळबळजनक पोस्ट

घटस्फोटाच्या चर्चेदरम्यानच नताशाच्या डेटिंगच्या चर्चा; हार्दिक पांड्यापूर्वी कुणाच्या प्रेमात होती?

48 तासांत ‘रेमल’ चक्रीवादळ धडकणार; महाराष्ट्रावर काय परिणाम होणार?

“कायदा आणि नियम फक्त सामान्य माणसांना छळण्यासाठी आहेत काय?”

शिखर धवन ‘या’ महिला क्रिकेटरशी करणार दुसऱ्यांदा लग्न?; स्वतःच केला मोठा खुलासा