बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘राष्ट्रवादी-शिवसेनेत वितुष्ट निर्माण होणार नाही’; सरनाईकांच्या लेटरबॉम्बनंतरही राष्ट्रवादीला विश्वास

मुंबई | शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक पत्रं लिहिलं आहे. या पत्रानंतर राजकारणात खळबळ उडाली आहे. कारण सरनाईक यांनी या पत्रात भाजपशी जुळवून घेण्याचं आवाहन शिवसेनेला केलं आहे. सरनाईक यांच्या या पत्रावर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया देत शिवसेनेवर विश्वास व्यक्त केला आहे.

जयंत पाटील म्हणाले की, मला वाटत नाही की सरनाईकांचा तो भाव असेल. शिवसेना पक्षातून राष्ट्रवादी किंवा काँग्रेसमध्ये कोणी गेलंय, असं आता झालेलं नाही. यामुळे आता अशापद्धतीने शिवसेना आणि राष्ट्रवादीत वितुष्ट निर्माण होईलं, असं मला वाटत नाही. मात्र, ज्यांनी पत्र लिहिलं आहे त्यांच्या मतदारसंघात असं काही झालंय का ते पाहावं लागेल.

अशाप्रकारे राष्ट्रवादी आणि काँग्रेस शिवसेना कमकुवत करत असल्याचा सरनाईकांचा आरोप पाटील यांनी फेटाळून लावला आहे. तर शिवसेना नेते संजय राऊत यांनी देखील जर एखाद्या आमदाराने मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं असेल तर त्यावर प्रतिक्रिया द्याव असं काय आहे, असं म्हणत सरनाईकांच्या लेटरबॉम्बवर प्रतिक्रिया देणं टाळलं आहे.

दरम्यान, 10 जून रोजी सरनाईक यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्रं लिहिलं होतं. सत्तेत असलेले राष्ट्रवादी-काँग्रेस आपलेच कार्यकर्ते फोडत आहेत. आपला पक्ष कमकुवत होत असेल तर मोदींशी जुळवून घेतलेलं बरं. त्यामुळे सरनाईक, अनिल परब, रवींद्र वायकर या सहकाऱ्यांना होत असेलला नाहक त्रास तरी थांबेल, असा दावा सरनाईक यांनी पत्रात केल्याचं कळतंय.

थोडक्यात बातम्या – 

अनिल अंबानींना मोठा झटका; अडचणी वाढण्याची शक्यता

…म्हणून कोरोना मृतांच्या कुटुंबियांना आम्ही 4 लाख देऊ शकत नाही- केंद्र सरकार

“उद्धव ठाकरेंचं वर्धापन दिनाचं भाषण हे एका सरकार प्रमुखाचं नसून एका गॅंग प्रमुखाचं होतं”

कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेबाबत जनजागृती करणं आवश्यक – अजित पवार

“उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व सोडलं नाही, मग महाशिव आघाडीची महाविकास आघाडी कशी झाली?”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More