मुंबई | सातारा लोकसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर साताऱ्यात घेतलेल्या शरद पवारांच्या त्या सभेला आज वर्ष पूर्ण झालं आहे. पवारांनी गेल्या वर्षी भर पावसात लोकांना संबोधित केलं होतं.
शरद पवारांच्या या सभेची आठवण करून देत राष्ट्रवादीने भाजपला टोला लगावला आहे. राष्ट्रवादीने सोशल मीडियावर शरद पवारांच्या सभेतील फोटो शेअर केले आहेत.
त्यांचे पैलवान तेल लावून तयार होते. त्यांनी शड्डू ठोकले पण समोर पैलवानच दिसत नाहीत, अशी त्यांची दर्पोक्ती. ते म्हणाले, #शरदपवार संपले. पण 18 ऑक्टोबर 2019 रोजी साताऱ्यात साक्षात वरुणराजा पवारसाहेबांच्या स्वागताला धावला. जनता चिंब भिजली, दिल्ली मात्र थिजली, असं राष्ट्रवादीने म्हटलंय.
महत्वाच्या बातम्या-
बिहारच्या मुख्यमंत्रीपदाबाबत अमित शहांचं मोठं वक्तव्य, म्हणाले…
‘गरज पडल्यास राज्यघटना बदलण्यासाठी अभ्यास सुरू’; खासदार संभाजीराजेंचं मोठं वक्तव्य
“मी आणि माझं कुटुंब म्हणत मुख्यमंत्री मात्र घरातच बसलेत”
7 महिने बंद असलेली मोनोरेल आजपासून पुन्हा सुरू
Comments are closed.