Top News महाराष्ट्र मुंबई

“शरद पवारांच्या वक्तव्याकडे वडिलकीचा सल्ला म्हणून पाहा”

मुंबई | महविकास आघाडी सरकार स्थिर रहावं असं वाटत असेल तर काँग्रेस नेतृत्त्वावर बोलणं टाळावं, असं ट्विट काँग्रेस नेत्या आणि बालकल्याण  मंत्री यशोमती ठाकूर यांनी केलं आहे. त्यांच्या बोलण्याचा रोख राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे असल्याचं बोललं जात आहे. अशातच राष्ट्रवादीचे प्रवक्ते महेश तपासे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

शरद पवारांनी केलेल्या वक्तव्याकडे एक वडिलकीचा सल्ला म्हणुन पाहावं, असं  महेश तपासे यांनी म्हटलं आहे. यशोमती ठाकूर यांच्या ट्विटनंतर त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.

शरद पवारांनी केलेल्या वक्तव्यामध्ये काहीही राजकारण नाही. महाविकास आघाडी सरकार तिन्ही पक्षाच्या विचारांचं भक्कम सरकार असल्याचंही महेश तपासे म्हणाले.

दरम्यान, काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यात सातत्याचा अभाव असल्याचं शरद पवार यांनी म्हटलं होतं. लोकमतला दिलेल्या एक मुलाखतीत त्यांनी राहुल गांधींबाबत हे वक्तव्य केलं होतं.

महत्वाच्या बातम्या-

‘हे हिंदू गद्दार आहे…’; युवराज सिंगच्या वडिलांचं वादग्रस्त वक्तव्य

‘मन में है विश्वास’नंतर ‘कर हर मैदान फतेह’; आयपीएस विश्वास नांगरे पाटील नव्यानं भेटणार!

वाह अजित दादा वाह, लाज नावाची गोष्ट शिल्लक राहिलीये का पाहा- निलेश राणे

शीतल आमटेंच्या आत्महत्याप्रकरणी अत्यंत धक्कादायक माहिती समोर!

शरद पवार यांच्या ‘त्या’ वक्तव्यामुळे महाविकास आघाडीत वादाची ठिणगी?

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या