बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘आम्ही त्याला पकडलं नाही फक्त त्याच्यासोबत…’; मलिकांच्या आरोपांवर भानुशालींचं प्रत्युत्तर

मुंबई | रविवारी संध्याकाळी एनसीबीने क्रुझवर छापा टाकला होता. या कारवाईत एनसीबीने ड्रग्ज जप्त करत अभिनेता शाहरूख खानचा मुलगा आर्यन खानला अटक केली. त्यावरून आता राज्यात राजकीय आरोप-प्रत्यारोपांना सुरूवात झाली आहे. राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी भाजपचे उपाध्यक्ष मनिष भानुशाली यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

एनसीबीने कारवाई केलेल्या प्रकरणासंबंधात मनिष भानुशाली यांचं नाव सध्या चर्चेत आहे. मनिष भानुशाली यांचे फोटो पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा तसेच देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत आहेत. त्यामुळे त्यांचे एनसीबीशी काय संबंध आहेत? असा आरोप नवाब मलिक यांनी मनिष भानुशाली यांच्यावर केला होता.

नवाब मलिक यांच्या आरोपाला भाजपचे उपाध्यक्ष मनिष भानुशाली यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. आम्ही त्याला पकडलं नाही. सगळी कारवाई एनसीबीने केली आहे. मी फक्त त्याच्यासोबत चालत होतो. नवाब मलिक जे आरोप करत आहेत. त्यामध्ये काहीही तथ्य नाही. तसेच भाजपमध्ये माझ्याकडे कुठलंही पद नाही आणि के.पी गोसावी कोण आहेत ? त्यांना देखील मी ओळखत नाही, असंही मनिष भानुशाली यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, आम्हाला जी माहिती मिळाली होती. त्याची साक्ष नोंदवायची होती म्हणून मी तिथे गेलो होतो, आम्ही त्यांना पकडलं नाही. तर देशहिताचं जे काम आहे ते आम्ही केलं, असं मनिष भानुशाली यांनी सांगितलं आहे. मनिष भानुशाली यांच्या प्रतिक्रियेनंतर आता राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.

थोडक्यात बातम्या-

“कर्ज मिळवताना 7 पिढ्या जातात, तुम्हाला 7 तासात 85 कोटींचं कर्ज मिळालंच कसं?”

अनिल देशमुखांना मोठा धक्का! अखेर ‘या’ बहुचर्चित पंचायत समितीवर भाजपचा कब्जा

केंद्रीय कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार गोड! केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याची शक्यता

“महाविकास आघाडी सरकारला आत्मचिंतनाची गरज, एकत्र येऊन भाजपला रोखलं पाहिजे”

मोठी बातमी! अखेर प्रियंका आणि राहुल गांधींना लखीमपूर खेरीला जाण्यास परवानगी

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More