बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘अडीच वर्षे ऐकलं नाही आतातरी…’; जयंत पाटलांचा राज्यपालांना खोचक टोला

मुंबई | भाजप आणि शिंदे गटाचे उमेदवार राहुल नार्वेकर हे या विधानसभा अध्यक्षांच्या निवडणूकीत विजयी झाले. तत्तपूर्वी मान्यवरांनी आपल्या गटाच्या उमेदवारांची नावे आणि भाषण दिली. त्यावेळी बोलताना राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्यावर निशाणा साधला.

जयंत पाटील म्हणाले, मागच्या अडीच वर्षापासून आम्ही राज्यपाल नियुक्त आमदारांसाठी 12 आमदारांच्या नियुक्तीसाठी बऱ्याच वेळा त्यांच्याकडे विनंती केली. पण त्यांनी ती मान्य केली नाही. आता भाजप आणि शिंदे गटाची सत्ता येण्याच्या मार्गावर असताना, 12 आमदारांच्या नियुक्तीबाबत विचार केला. मुख्यमंत्र्यांसह कित्येक मंत्र्यांचे शिष्टमंडळ राज्यपालांना भेटले. परंतु त्यांनी यावर कोणताही निर्णय घेतला नाही. राज्यपालांनी आता आलेल्या सरकारची मागणी मान्य करुन आम्ही दिलेल्या 12 आमदारांची यादी तशीच ठेऊन त्यांना लवकर पद द्यावे ही विनंती करत असल्याचं म्हटलं.

याचबरोबर विधानसभेच्या अध्यक्षांच्या निवडीसाठी राज्यपालांकडे मागणी करुनही त्यांना यावर निर्णय घेण्यासाठी वेळ मिळाला नाही. परंतु त्यांनी विरोधकांच्या मागणीला लगेच मान देऊन निवडणूक घेतली. तसेच 12 आमदारांच्या नियुक्तीबाबत विचार करावा असं पाटील म्हणाले. यावरुन सभागृहात एकच हशा पिकला.

अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक होणार असल्याने महाविकास आघाडी, भाजप आणि शिंदे गटाचे सर्व आमदार उपस्थित होते. विधानसभेच्या अध्यक्षपदांच्या निवडणूकीच्या प्रक्रियेला सुरुवात करताना उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी राज्यपालांच्या आदेशाचे वाचन केले. यावर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राज्यपालांच्या निर्णयावर खोचक टीका केल्याने सभागृहात एकच हशा पिकला.

थोडक्यात बातम्या – 

“कसाबच्या वेळीसुद्धा एवढी सुरक्षा नव्हती, इतकी भीती कशाची”

मोठी बातमी! शिवसेना विरूद्ध शिंदे गटात वादाची नवी ठिणगी

राकेश झुनझुनवालांना मोठा झटका; झालं ‘इतक्या’ कोटींचं नुकसान

“देवेंद्र फडणवीस येतील असं वाटलं होत पण अर्धवट येतील असं वाटलं नव्हतं”

“मी सुद्धा बऱ्याचदा मुख्यमंत्री झालो पण मला कोणत्याही राज्यपालांनी पेढा भरवलेलं आठवत नाही”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More