बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“माझा नवरा बलात्कारी नाही, त्यानं कुणाचंही आयुष्य उद्ध्वस्त केलेलं नाही”

मुंबई | राष्ट्रवादी युवक काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख आणि भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांच्यातला वाद आता विकोपाला गेला आहे. मेहबूब शेख यांनी पारनेरच्या सभेत चित्रा वाघ यांना लाचखोर नवऱ्याची बायको असा उल्लेख केला होता. त्यामुळे चित्रा वाघ या मेहबूब शेख यांच्यावर चांगल्याच भडकल्या आहेत.

आडनाव वाघ असल्याने कोणी वाघ होत नाही, आणि आम्ही बाप बदलणारे तर मुळीच नाही, डॉयलागबाजी सोडा, आणि आपल्या नवऱ्यावर कारवाई झाली होती. तेव्हा सरकार कुणाचं होतं ते सांगा?, जसं आम्ही म्हणतो आमची नार्को करा तसं तुमच्या नवऱ्याची नार्को टेस्ट करा, कर नाही त्याला डर कशाला.  भूंकतय कोण हे सर्व महाराष्ट्र पाहतोय, मीही बाप बदलणाऱ्याच्या बापाला घाबरत नाही, असा घणाघात मेहबूब शेख यांनी चित्रा वाघ यांच्यावर केला होता.

दुसरी काही टीका करता येत नाही म्हणून माझ्यावर वैयक्तिक टीका केली जात आहे. मेहबूब शेख बलात्कारी आहे का? हा वैयक्तिक मुद्दा नाही आहे.  मी कोणत्याही धमक्यांना घाबरत नाही. ते सांगताहेत त्या सगळ्या टेस्ट करायला मी तयार आहे. माझा नवरा बलात्कारी नाही आहे, त्यानं कुणाचंही आयुष्य उद्ध्वस्त केलेलं नाही. त्यामुळे मी यांना भीक घालणार नाही, अशी टीका चित्रा वाघ यांनी शेख यांच्यावर केली आहे.

दरम्यान, लंकेच्या सभेत मला आव्हान देताहेत, तोच लंके जो एका महिलेला अॅट्रोसिटीच्या धमक्या देत आहे. तो वैद्यकीय अधिकाऱ्यांवर धावून जातोय म्हणजे ज्याच्या विरोधात आम्ही बोलणार, तिथे जाऊन टीका करणार. अरे जा रे जा मी वाघ आहे, कुणाच्याही बापाला घाबरत नाही आहे, असं चित्रा वाघ म्हणाल्या होत्या.

थोडक्यात बातम्या-

अक्षय बोराडे पुन्हा अडचणीत, पत्नीनंतर तरूणीने केला मोठा गुन्हा दाखल

शेअर मार्केटमधील सर्वात मोठी घडामोड, देशातील ‘या’ सर्वात जुन्या बॅंकेचा येतोय आयपीओ!

सत्ता स्थापनेच्या कार्यक्रमात तालिबाननं दिलं ‘या’ सहा देशांना निमंत्रण, भारताच्या कट्टर शत्रूराष्ट्रांचा समावेश!

“मुंडेने कितीही स्वतःला वाचवायचा प्रयत्न केला तरी नियती त्याला सोडणार नाही”

‘… त्यांना लाज कशी वाटत नाही’; बेळगाव महापालिकेच्या निकालानंतर राऊत भडकले

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More