शेतकऱ्यांच्या लाँग मार्चला आता राष्ट्रवादी काँग्रेसचाही पाठिंबा

नाशिक | शेतकऱ्यांच्या लाँग मार्चला आता राष्ट्रवादी काँग्रेसनेही आपला पाठिंबा जाहीर केला आहे. हल्लाबोल यात्रेच्या सांगता सभेत खासदार सुप्रिया सुळे यांनी यासंदर्भात घोषणा केली.

शेतकऱ्यांची सुरू असलेली पदयात्रा कौतुकास्पद आहे. आमचा त्याला पाठिंबा आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीवतीने विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे अंतिम सभेस उपस्थित राहतील, असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलंय. 

दरम्यान, याआधी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या मोर्चाला आपला पाठिंबा दिलाय. ठाणे आणि मुंबईत मनसे या मोर्चाचं जोरदार स्वागत करणार आहे.